अवघा 1 रुपया आणि 10 मिनिटांत असं AC सर्व्हिस करा !

Feb 09, 2021, 15:40 PM IST
1/6

AC च्या फिल्टरची स्वच्छता

AC च्या फिल्टरची स्वच्छता

जेव्हा आपण एसीचे पुढील पॅनेल उघडता तेव्हा फिल्टर आपल्या समोर दिसेल. धुळीमुळे तो खराब. झाला असेल तर बाहेर काढून स्वच्छ करून परत ठेवा.  

2/6

स्विंग फ्लॅपची स्वच्छता

स्विंग फ्लॅपची स्वच्छता

एसीचा पुढचा भाग काढून घ्या. समोर तीन स्क्रू दिसतील. ते उघडा. यानंतर आपल्याला स्विंग फ्लॅप दिसेल. तेही खाली करुन बाहेर घ्या. आता तुम्हाला दोन स्क्रू दिसतील तेही बाहेर काढा.  

3/6

पॅनलवरच्या जाळीची स्वच्छता

पॅनलवरच्या जाळीची स्वच्छता

आपल्याला पॅनेलचा वरचा भाग दिसेल. वरच्या दिशेने वर करुन हळू बाहेर घ्या आणि चांगले स्वच्छ करा.  

4/6

कूलिंग क्‍वाइॅलची स्वच्छता

कूलिंग क्‍वाइॅलची स्वच्छता

यानंतर तुम्ही थंड कॉइल पाहू शकाल. सर्वप्रथम कोरड्या कपड्याने ते स्वच्छ करा. यानंतर मग थोडेसे पाणी घ्या आणि दात घासण्याच्या ब्रशच्या मदतीने वरपासून खालपर्यंत स्वच्छ करा. ते तुटणार नाही याची काळजी घ्या.

5/6

ओला कपडा आणि कॉलिनचा वापर करा !

ओला कपडा आणि कॉलिनचा वापर करा !

लक्षात ठेवा, बाजूला असलेल्या तारा आणि सर्किट्सला स्पर्श करू नका.  खालच्या बाजुने हवा येते ते ठिकाणं स्वच्छ करावे लागेल. यासाठी, ओले कापड किंवा कॉलीन देखील वापरु शकता.  

6/6

इथे खर्च होईल 1 रुपया

इथे खर्च होईल 1 रुपया

AC च्या स्वच्छतेसाठी तुम्हाला 1 रुपयांच्या छोट्या शॅम्पूची गरज लागेल. ज्यामुळे फिल्टरची स्वच्छता होईल. सर्व पार्ट्स स्वच्छ करुन सुकल्यानंतर एकएक करुन सर्व पार्ट्स लावून घ्या.