Paris Olympics 2024: ऑलिम्पिक गाजवणाऱ्या 'या' खेळांडूचे बायोपिक एकदा पहाच

ऑलिम्पिक गाजवणाऱ्या खेळाडूंच्या बायोपिकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 

Jul 29, 2024, 16:48 PM IST

क्रिडा विश्वात सध्या ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. मनू भाकरने कांस्यपदक मिळवल्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने खातं खोललं आहे. 

1/8

क्रिडा विश्वात सध्या ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. मनू भाकरने कांस्यपदक मिळवल्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने खातं खोललं आहे. 

2/8

10 मीटर एअर पिस्तूल मध्ये मनू भाकरने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. गेल्या 12 वर्षांत भारताने नेमबाजीमध्ये कोणतंही पदक मिळवलं नव्हतं. नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवणारी मनू पहिली भारतीय महिला ठरली. 

3/8

ऑलिम्पिक स्पर्धेत आजवर अनेक खेळाडूंनी भारताचं नेतृत्व केलं. याच काही खेळाडूंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. 

4/8

मिल्खा सिंगच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरने त्याच्या शरीरावर खूपच मेहनत घेतली होती. मिल्खा सिंगची कारकिर्द आणि त्याचा जीननप्रवास या भाग मिल्खा भाग मधून दाखवण्यात आला. त्यासाठी फरहानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देखील मिळाला. 

5/8

फातिमा सना शेखने साकारलेल्या गीता फोगटच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. दंगल सिनेमामुळे फातिमाला लोकप्रियता मिळाली. 

6/8

मुरलीकांत पेटकरच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या चंदू चॅम्पिअनमधल्या कार्तिक आर्यनच्या भूमिकेला चाहत्यांनी प्रेम दिलं. 

7/8

देसी गर्लच्या प्रियंकाच्या  दिलखेचक अदांवर चाहते कायमच फिदा असतात, मात्र तिने साकारलेली मेरीकोमच्या भुमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मेरीकोमची  इच्छाशक्ती आणि तिची जिद्द यावर हा सिनेमा भाष्य करतो. 

8/8

बॅडमिंटन म्हटलं की आठवते ती  सायना नेहवाल. आंतराराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठीचा तिचा संघर्षमय प्रवास सायना या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. परिणिती चोप्राला या सिनेमातील भूमिकेसाठी लक्षवेधी पुरस्कार देण्यात आला.