Kartiki Ekadashi Wishes in Marathi : कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा, विठुमाऊली-रखुमाईचा कायम राहिल कृपाशिर्वाद
Kartiki Ekadashi Wishes In Marathi: विठुरायाच्या स्मरणात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. आपल्या जवळच्या व्यक्तींवर कायम विठ्ठल आणि रखुमाईचा कृपाशिर्वाद राहावा म्हणून द्या मराठीतून शुभेच्छा.
Kartiki Ekadashi Wishes In Marathi: कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीलाचं प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात.
वर्षात दोन मोठ्या एकादशी येतात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. या दोन्ही एकादशीचे महत्त्व आणि फरक समजून घ्या. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात. तसेच कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या जवळच्या व्यक्तीला द्या मनापासून शुभेच्छा. विठुरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.
(फोटो सौजन्य - iStock)