Keshav Maharaj : कथक डान्सरच्या प्रेमात पडला आणि...; केशव महाराजला का लपवून ठेवावं लागलेलं रिलेशनशिप?

दक्षिण आफ्रिकेचा लेफ्ट ऑर्थोडॉक्स स्पिनर गोलंदाज केशव महाराज भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत दिसला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात फलंदाजीसाठी तो क्रिजवर येताच. स्टेडियममध्ये 'राम सिया राम' हे गाणे वाजू लागले. यानंतर भारतीय कर्णधार केएल राहुल त्याच्याशी याबद्दल बोलताना दिसला.तुम्हाला माहित आहे का  हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हिंदू आहे आणि त्याची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही.

Dec 24, 2023, 12:13 PM IST
1/7

केशव महाराज याची पत्नी लेरीशा मुनसामी ही एक प्रसिद्ध कथ्थक डान्सर आहे. इतकंच नाही तर तिला बॉलीवूड गाणी, हिंदी चित्रपट आणि बॉलीवूड डान्समध्ये खूप आवड असल्याची माहिती आहे.  

2/7

केशव महाराज हा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू असून त्याचे पूर्वज उत्तर प्रदेशातील होते. 1874 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याचं कुटुंबिय स्थलांतरित झाले. खुद्द केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी 2018 मध्ये एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते, '1 सप्टेंबर 1874 रोजी माझे पणजोबा यूपीतील सुलतानपूरहून डर्बनला स्थायिक झाले.'    

3/7

केशव महाराजांच्या लव्ह स्टोरी वेगळी असून त्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. मैत्रीनंतर हळूहळू केशव आणि लेरीशा एकमेकांवर प्रेम करू लागले. विशेष म्हणजे केशवने बरेच दिवस त्या दोघांचं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं.    

4/7

दोघांचंही नातं कुटुंबासमोर कसं ठेवायचं हे सर्वात मोठं आव्हान होतं. याचं कारण म्हणजे दोघांचं बॅकग्राऊंड फारच वेगळं होतं. केशवने त्याच्या आईच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये त्याने लेरिशासोबत कथ्थक नृत्य केलं. जे त्याच्या आईला खूप आवडल्याने तिने या नात्याला होकार दिला.

5/7

केशव आणि लेरिशाची 2019 मध्ये साखरपुडा झाला. यानंतर तब्बल 3 वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लारीशासोबत सात फेरे घेतले होते.  .

6/7

केशव महाराजची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फार उत्तम आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 49 टेस्ट सामन्यांमध्ये 158 विकेट्ससह 1129 रन्स केले आहेत. केशव दक्षिण आफ्रिकेच्या तिन्ही फॉर्मेटसाठी खेळतो.   

7/7

याशिवाय केशवने वनडे क्रिकेटमध्ये 44 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 55 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये 238 रन्स केले आहेत. T20 मध्ये त्याने 27 सामन्यात 24 विकेट घेतल्या असून 79 रन्स केलेत.