Ertiga आणि Innova ला तगडी स्पर्धा; बाजारात लाँच झाली जबरदस्त 7 सीटर कार, तब्बल 21 किमी मायलेज

किया इंडियाने आपली प्रसिद्ध 7 सीटर एमपीव्ही Kia Carens च्या नव्या डिझेल मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडेलला लाँच केलं आहे.   

Apr 02, 2024, 19:13 PM IST

किया इंडियाने आपली प्रसिद्ध 7 सीटर एमपीव्ही Kia Carens च्या नव्या डिझेल मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडेलला लाँच केलं आहे. 

 

1/10

किया इंडियाने आपली प्रसिद्ध 7 सीटर एमपीव्ही Kia Carens च्या नव्या डिझेल मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडेलला लाँच केलं आहे.   

2/10

Kia Carens ने डिझेल मॅन्यूअल ट्रान्समिशन व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 12 लाख 67 हजार रुपये ठेवली आहे.   

3/10

नव्या पेंट स्कीमसह सध्याच्या व्हेरियंटला अनेक नव्या फिचर्ससह अपडेट करण्यात आलं आहे. याच्या नव्या व्हेरियंटमध्ये प्रीमिअम (0), प्रेस्टीज (0) आणि प्रेस्टीज + (0) यांचा समावेश आहे.   

4/10

प्रीमिअम (0) मध्ये कीलेस एंट्री, 8 इंचाची इंफोटेनमेंट स्क्रीन, शार्क फिन अँटीना, स्टिअरिंग व्हील माऊंटेड कंट्रोल आणि बर्गलर अलार्म मिळतो.   

5/10

तर प्रेस्टीज (0) मध्ये 6 किंवा 7 सीटर लेआऊट, लेदरेट गियर नॉब, पुश बटण स्टार्टयासह स्मार्ट की, रिअर एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल आणि पोजिशनिंग लॅम्पचा पर्याय देण्यात आला आहे.   

6/10

प्रेस्टीज + (0) व्हेरियंट फक्त ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससह येतं. त्यात एलईडी मॅप लॅम्प आणि रुम लॅम्पसह इलेक्ट्रिक सनरुफ मिळतं.   

7/10

रेंज टॉपिंग एक्स लाईन ट्रिममध्ये कंपनीने आता डॅशकॅम फिचर दिलं आहे. याशिवाय वॉइस कमांडसह सर्व विंडो ऑपरेट कऱण्याची सुविधाही मिळते.   

8/10

किया कॅरेन्समध्ये इंजिनचे तीन पर्याय मिळतात. ज्यामध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन, 1.5 लीटर नॅच्यूरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.   

9/10

Kia Carens ची सुरुवातीची किंमत 10 लाख 52 हजार असून, टॉप व्हेरियंटमध्ये ती 19 लाख 67 हजारांपर्यंत जाते.   

10/10

Kia Carens चं पेट्रोल व्हेरियंट सामान्यपणे ताशी 16 किमी आणि डिझेल व्हेरियंट ताशी 21 किमीचा मायलेज देते.