...अन् किम जोंग उनने 30 सरकारी अधिकाऱ्यांना संपवलं! पूरग्रस्त भागाचा दौरा ठरला कारण; पाहा PHOTOS
North Korea Kim Jong Un Flood Visit: जगभरामध्ये हुकूमशाहीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या देशामधून नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या देशाला पूराचा मोठा फटका बसल्यानंतर इथल्या हुकूमशाहाने घेतलेला निर्णय सध्या जगभरात चर्चेत आहे. स्वत: पूरग्रस्त भागाची पहाणी केल्याने या हुकुमशाहाने काय केलं आहे जाणून घ्या...
1/7
2/7
3/7
दक्षिण कोरियामधील चोसन टीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये या दोषी अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. "ज्यांच्यामुळे या नैर्गिक संकटाचा समाना करावा लागला त्यांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे," असं दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये काही जणांची चौकशी केली जात असून यामध्ये या प्रांतातील किम जोंग उन यांच्या पक्षाचे सचिव कांग बाँग हून यांचाही समावेश आहे.
4/7
आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील नियोजनाकडे ज्यांनी दूर्लक्ष केलं त्यांना कठोर शिक्षा देण्याचे आदेश किम जोंग उन यांनी दिल्याचं वृत्त उत्तर कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलं आहे. या पूरामध्ये 4 हजार घरं वाहून गेली. तर 5 हजारांहून अधिक कुटुंब बेघर झाली आहेत. किम जोंग उन स्वत: या भागाच्या पहाणी दौऱ्यासाठी गेलेले.
5/7
6/7
किम जोंग उन या भागात अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्यातून कार आणि चालत पहाणी करत फिरले. पूर येऊन गेलेल्या भागातील साफसफाई आणि डागडुजीसाठी किंमान दोन ते तीन महिने लागणार असल्याची माहिती किम जोंग उन यांनी जाहीर केलं आहे. पूराचा फटका बसलेल्या तीन जिल्ह्यांमधील भागाला स्पेशल डिझास्टर इमर्जन्सी झोन्स म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. उत्तर कोरियामध्ये जंगलांचा नाश झाल्याने मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळत आहे.
7/7