मोबाइल, रिमोट अन्...; तुमच्या टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरड्या असणाऱ्या 8 वस्तू

करोनानंतर आपल्यातील अनेकजण स्वच्छतेसाठी आग्रही झाले आहेत. पण अद्यापही आपण अशा अनेक गोष्टी हाताळत आहोत ज्या आपल्या घरातील टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरड्या आहेत. या गोष्टींची यादी पाहिली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण या आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टी आहेत. जाणून घ्या या गोष्टींची यादी  

| Jun 29, 2023, 19:39 PM IST
1/9

करोनानंतर आपल्यातील अनेकजण स्वच्छतेसाठी आग्रही झाले आहेत. पण अद्यापही आपण अशा अनेक गोष्टी हाताळत आहोत ज्या आपल्या घरातील टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरड्या आहेत. या गोष्टींची यादी पाहिली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण या आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टी आहेत. जाणून घ्या या गोष्टींची यादी  

2/9

उशीचं कव्हर

एका अमेरिकन कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार उशीचे कव्हर महिनोमहिने न धुता तसेच वापरले जातात. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड किटाणू असतात. त्यामध्ये सरासरी टॉयलेट सीटमध्ये 17 हजार पट जास्त किटाणू असतात.

3/9

स्मार्टफोन

स्मार्टफोनवर टॉयलेट सीटपेक्षाही 10 टक्के जास्त बॅक्टेरिया असतात. आपण अनेक ठिकाणी स्पर्श केल्यानंतर तो हात मोबाइलवर वापरत असतो. त्यामुळे तो नेहमी स्वच्छ करत जात. 

4/9

किबोर्ड

तुम्ही रोज कामाच्या निमित्ताने हात लावत असलेल्या किबोर्डवरही फार घाण असते. अॅरिझोना विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे की, किबोर्डमध्ये प्रति चौरस इंच सरासरी 3000 पेक्षा जास्त जीवाणू असतात. कीबोर्ड साफ करण्यासाठी, तुम्ही कॉम्प्रेस्ड एअरचा कॅन किंवा ब्रश अटॅचमेंटसह व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता.

5/9

माऊस

तुमचा माऊस किती घाण असतो याची तुम्हाला कल्पनाही नसेल. किबोर्डप्रमाणे त्याच्यावरही फार घाण साचलेली असते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले यांनी केलेल्या अभ्यासात सरासरी माऊसमध्ये प्रति चौरस इंच 1500 पेक्षा जास्त जीवाणू असतात असं आढळून आलं आहे. 

6/9

रिमोट कंट्रोल

घाणेरड्या वस्तूंच्या यादीत एक अशी गोष्ट आहे जी आपल्या घरात मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच हाताळत असतात. ते म्हणजे रिमोट कंट्रोल. अभ्यानुसार, रिमोटच्या प्रती चौरस इंचात 200 बॅक्टेरिया असतात. 

7/9

वॉशरुमच्या दरवाजाचं हँडल

वॉशरूमच्या दाराच्या हँडलला दिवसातून अनेकजण स्पर्श करत असतात. त्यातही सार्वजनिक शौचालयांमध्ये किती वेळा स्पर्श झाला असेल हे पाहता आश्चर्य वाटू नये. वॉशरूम किंवा बाथरूमच्या दाराची हँडल आणि नॉब्समध्ये  फार जंतू असतात. ते फार कमी वेळा स्वच्छ केले जातात. 

8/9

पाण्याचे नळ

पाण्याच्या नळांना अनेकदा हात न धुतलेले लोक स्पर्श करतात आणि त्यामुळे ते जंतूंचे केंद्र बनतात. आपले हात धुत असतानाच साबण किंवा डिटर्जंटने नळ स्वच्छ करणं जास्त कठीण काम नाही. 

9/9

फ्रिजचा दरवाजा

अनेक लोक हात न धुता रेफ्रिजरेटरच्या दरवाजाला हात लावत असतात. . कॅलिफोर्निया विद्यापीठ, डेव्हिसने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की रेफ्रिजरेटरच्या दरवाज्यात प्रति चौरस इंच 500 पेक्षा जास्त जीवाणू असतात.