फक्त वडापावच नाही, तर मुंबईत 'हे' पदार्थही आहेत प्रसिद्ध

मुंबईत काही असे पदार्थ आहेत, ज्याची चव तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी सारखी सापडणं कठीण आहे. 

Mar 24, 2024, 19:52 PM IST

मुंबईत काही असे पदार्थ आहेत, ज्याची चव तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी सारखी सापडणं कठीण आहे. 

1/9

मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. मुंबईमध्ये कधीच कोणी उपाशी राहत नाही असं म्हणतात. इथे येणारा प्रत्येक माणूस आपलं पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करतच असतो. पण मुंबईत काही असे पदार्थ आहेत, ज्याची चव तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी सारखी सापडणं कठीण आहे.

2/9

बन मस्का

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

बन मस्का हा मुंबईमधील खाण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबईतील अनेक बेकरीत तुम्ही इराणी चहा आणि बन मस्का खाण्याचा आनंद घेऊ शकता 

3/9

वडापाव

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

मुंबई आणि वडापाव हे एक आगळंवेगळं समीकरण आहे. मुंबईत अगदी प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला वडापाव खायला मिळू शकतो.  1966 मध्ये अशोक वैद्य या व्यक्तीने वडापावचा शोध लावला आणि दादरला पहिला वडापावचा स्टॉलही या व्यक्तीने लावला होता.

4/9

पावभाजी

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

वडापावनंतर मुंबईत सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पाव भाजी. अनेक चौपट्यांवर, तसेच रात्रीच्या वेळी मुंबईतील पावभाजी खाण्याची मज्जा काही औरच असते. 

5/9

सँडविच

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

सँडविच हे देखील मुंबईतील सर्वात प्रसिद्ध खाणे आहे. यात तुम्हाला काकडी, बीट, कांदा, बटाटा, टोमॅटो, मस्का, ब्रेड, चटणी याची चव चाखायला मिळते. 

6/9

मिसळ पाव

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

मुंबईत अनेक ठिकाणी उत्कृष्ट मिसळ पाव मिळतो. वडापाव, पावभाजी यानंतर सर्वाधिक चवीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणून मिसळ पावला ओळखले जाते. 

7/9

पाणीपुरी

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

मुंबईतील विविध चौपाट्यांवर पाणीपुरी, भेळ, रगडा पुरी, शेवपुरी हे पदार्थ चवीने खाल्ले जातात. याची चव खूप चमचमीत असते.

8/9

भुर्जी पाव

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

जर तुम्ही मुंबईत रात्री फिरण्याचा प्लॅन केला आणि भूक लागली असेल तर मुंबई स्टाईल भुर्जी पाव तुम्ही हमखास ट्राय करु शकता. 

9/9

खिमा पाव

know the Best Street Food in Mumbai famous dishes You Must Try

खिमा पाव हे मुंबईतील 'सर्वोत्कृष्ट मांसाहारी स्ट्रीट फूड'पैकी एक आहे. अनेक मुंबईकर नॉनव्हेजच्या दिवशी खिमा पाव खाण्याला पसंती देतात.