फ्रिज जास्त थंड ठेवल्यास अन्न जास्त वेळ सुरक्षित राहतं का? अनेकांचा आहे मोठा गैससमज, जाणून घ्या सत्य

Home Refrigerator Myths: आजकाल प्रत्येकाच्याच घरात रेफ्रिजरेटर आहे. दूध, फळं, भाज्या तसंच उरलेलं अन्न ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. याशिवायही अनेक गोष्टी फ्रिजमध्ये स्टोअर केल्या जातात. दरम्यान फ्रिजच्या वापरासंबंधी अनेक गैरसमजही आहेत. तुमच्याही मनात असे काही गैरसमज असतील तर आताच दूर करुन घ्या.  

Mar 29, 2023, 21:25 PM IST
1/5

फ्रिजसंबंधी एक असा समज आहे की, जास्त थंड ठेवल्यास त्यातील गोष्टीही तितक्याच फ्रेश राहतात. पण हे खरं आहे की, फ्रिजचं तापमान फार कमी ठेवल्यास बॅक्टेरियाची वाढ रोखण्यात मदत होते.   

2/5

पण कोथिंबीर, काकडी आणि टोमॅटो यांसारखी फळं आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवल्यास खराब होतात. यासोबतच फ्रिजला अतिशय कमी तापमानात काम करण्यासाठी अतिरिक्त काम करावं लागते आणि विजेचा वापरही वाढतो.   

3/5

दरम्यान काहींना गरम जेवण फ्रिजमध्ये ठेवल्यास काही होत नाही  असं वाटतं. पण गरम जेवण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचं तापमान अजून वाढू शकतं. यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेलं जेवण अजून खराब होऊ शकतं.  

4/5

तसंच काहींना वाटतं की, फ्रीजमध्ये सर्व ठिकाणी समान कुलिंग होते. पण असं होत नाही. फ्रिजच्या दरवाजात असणाऱ्या कप्पे तुलनेने गरम असतात. तसंच वरील शेल्फ खालच्या तुलनेत जास्त थंड असतात.   

5/5

अशा स्थितीत चांगल्या कुलिंगसाठी वस्तू योग्य क्रमाने ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, शिजलेलं अन्न वरच्या कप्प्यात ठेवू शकतो. तर भाज्यांना खाली ठेवण्यात येऊ शकतं.