1/7
लहानपणीच मणिकर्णिका नाव देण्यात आलं
19 नोव्हेंबर 1828 मध्ये बनारसच्या एका मराठी ब्राम्हण कुटुंबात राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला. राणी लक्ष्मीबाई यांच लहानपणी मणिकर्णिका हे नाव ठेवण्यात आलं. घरातील मंडळी त्यांना मनु या नावाने हाक मारत असतं. 4 वर्षांची असताना मणिकर्णिकाच्या आईचे निधन झाले. वडिल मोरोपंत तांबे कानपुरमधील बिठूर जिल्ह्यातील पेशवांकडे काम करत असतं. पेशवा यांनी मणिकर्णिकाला मुलीप्रमाणे सांभाळलं ते तिला लाडाने छबीली म्हणायचे.
2/7
मणिकर्णिकाचं महाराजा राजा गंगाधर राव नेवलकरसोबत केलं लग्न
3/7
झाशीच्या राणीला किल्ला खाली करून जाण्यास सांगितलं
राजाचं निधन झाल्यानंतर इंग्रजांनी चुकीचा मार्ग स्विकारला. लॉर्ड डलहौजीने ब्रिटीश साम्राज्य परसवण्यासाठी झाशीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी दामोदारला झाशीचा उत्तराधिकारी स्विकारण्यास नकार दिला. झाशीच्या राणीने वर्षाला 60 हजार रुपये पेंशन स्विकारण्यास आणि झाशीचा किल्ला खाली करण्यास सांगितलं.
4/7
झांसी वाचवण्यासाठी राणी तयार केली सेना
5/7
राणीने इंग्रजांशी केली लढाई
18 जून 1858 मध्ये ह्यूरोज स्वतः मैदानात उतरला. तेव्हा राणी दामोदर राव रामचंद्र देशमुख यांना ठेवून इंग्रजांशी युद्ध करण्यासाठी सोनरेखाजवळ पोहोचली. मात्र त्यावेळी राणीचा घोडा या नदीला पार करू शकला नाही. तेव्हा एका इंग्रजाने राणीवर मागू वार केला ज्यामध्ये राणीला मोठी जखम झाली. त्याचवेळी राणी 23 वर्षी धारातिर्थी पडली.
6/7
मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी
कंगना रानौत `मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी` हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन क्रिशने केलं असून सिनेमाची गोष्ट विजयेंद्र यांनी लिहिली आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान कंगना रानौतने घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकली आहे. या सिनेमातील हा सीन शुट करताना कंगनाचा अपघात देखील झाला.
7/7