आकाशातून कसा बरसतो बर्फ? Snowfall म्हणजे नेमकं काय, तो कधी वितळतो माहितीये?

Snowfall Interesting Facts: पावसाऐवजी आकाशातून ठराविक भागातच कसा बुवा बर्फच बरसतो? कधी पडलाय का प्रश्न? पाहा या प्रश्नाचं उत्तर 

Feb 07, 2024, 13:00 PM IST

Snowfall Interesting Facts: जम्‍मू-कश्‍मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या आणि उत्तर पूर्वेला असणाऱ्या राज्यांवर सध्या बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. 

1/7

हिमवृष्टी

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

यंदाच्या वर्षी काहीशी उशिरानं का असेना पण, देशाच्या या भागांमध्ये हिमवृष्टी झाली आणि पुन्हा एकदा इथलं सृष्टीसौंदर्य बहरून आलं. वर्षाच्या ठराविक काळात या ठराविक भागांमध्ये हमखास हिमवृष्टी होते. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी हीच हिमवृष्टी अनेकदा अडचणींची परिस्थितीसुद्धा निर्माण करते. पण, ही हिमवृष्टी किंवा बर्फवृष्टी नेमकी होते कशी याचा विचार तुम्ही केला आहे का?   

2/7

कशी होते हिमवृष्टी?

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळं समुद्र, महासागर, नद्या, झरे, ओढे, तला. यांच्यातील पाण्याची वाफ होते अर्थात बाष्पीभवनाची प्रक्रिया होते आणि ही वाफ वजनानं हलकी असल्यामुळं सहजगत्या आकाशात जाते. पुढे ती वातावरणाच्या या थरातील तापमानानुसार ढगांचा आकार घेते. 

3/7

तापमान शून्याहूनही कमी

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

तापमान शून्याहूनही कमी किंवा त्याखाली असेल तर या वाफेचं बर्फात रुपांतर होतं आणि ती लगेचच हिमवृष्टीच्या रुपात पुन्हा पृथ्वीवर पोहोचते. दरम्यान, ही वाफ किंवा बर्फाचे ढग तयार होऊन वाऱ्याच्या वेगामुळं त्याचे लहानलगान तुकडे होतात आणि हे हिमकण भूपृष्ठावर पोहोचतात.   

4/7

पर्वतांमध्येत का होते हिमवृष्टी?

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

पर्वतीय भाग समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचावर स्थित असतात. त्यामुळं इथं तापमान कायमच कमी असतं. अनेकदा येथील कमी तापमान गारपीटीच्या रुपातही परिणाम करताना दिसतं. जमिनीच्या दिशेनं येताना बर्फाचे हे कण ओझोनच्या थरातून पुढं येतात आणि काही प्रमाणात वितळतात. पण, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र हा वितळलेला बर्फ पुन्हा एकदा बर्फातच रुपांतरीत होतो आणि हिमवृष्टीच्या स्वरुपात पाहायला मिळतो. 

5/7

कोणते घटक महत्त्वाचे?

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

शास्त्रीय कारणांनुसार बर्फ तयार होण्यासाठी वातावरणातील तापमान शून्य अंशाहून कमी असणं गरजेचं आहे. या निर्देशांकाला हिमांक असंही म्हणतात. भूपृष्ठाचं तापमान हिमांक किंवा त्याहून कमी झाल्यास हिमवृष्टीस सुरुवात होते. 

6/7

काही अती थंड प्रदेशांमध्ये हिमवृष्टी का होत नाही?

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

सहसा तापमान उणे 9 अंशांहूनही कमी झालं की हिमवृष्टी होते. पण, हिमवृष्टीसाठी हवेतील आर्द्रताही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळं कडाक्याची थंडी पडलेली असतानाही कोरड्या प्रदेशांमध्ये मात्र हिमवृष्टी होत नाही, कारण तिथं आर्द्रतेचा अभाव असतो. अंटार्क्टिकेती कोरड्या दऱ्या याचच उदाहरण आहेत. 

7/7

किती वेळात बर्फ वितळतो?

Knowledge What is the meaning of Snowfall know interesting facts

धूळ आणि दुसऱ्या गडद रंगांच्या कणांचा बर्फाचा आकार आणि त्याच्या वितळण्याच्या वेगावर परिणाम होतो. जर बर्फाचा रंग गडद आहे तर त्याच्यामध्ये सूर्यकिरणं शोषून घेण्याची अधिक क्षमता असते. काही निरीक्षणांतून समोर आलेल्या माहितीनुसार स्नोफॅकच्या पृष्ठावरील बर्फ धूळ बसल्यास 21 ते 51 दिवसांमध्ये वितळतो. तापमान 2 ते 4 अंशांच्या घरात असल्यास बर्फ 5 ते 18 दिवसांतच वितळतो.