Konkan Railway : गणेशोत्सवाची सोय झाली; रेल्वे विभागाकडून विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर

Konkan Railway : तिथं कोकण पट्टासुद्धा गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होत आहे. चाकरमान्यांना आता गावाकडची वाट खुणावतानाच अनेक घरांमध्ये गावाला नेमकं कधी जायचं यावरही चर्चा होताना दिसतेय.   

Jul 26, 2023, 07:54 AM IST

Konkan Railway : अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठीच्या तयारीला आता वेग आला आहे. ठिकठिकाणी असणाऱ्या गणेश चित्रशाळांमध्ये गणरायाच्या सुबक मूर्ती साकारल्या जात आहेत. तर, यंदाच्या वर्षी कोणती सजावट करायची यासाठीच्या पर्यायावरही अनेकजण काम करताना दिसत आहेत 

1/8

गणेशोत्सव 2023

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

Konkan Railway : गणशेत्सवानिमित्त रंगणाऱ्या या चर्चांमध्ये सर्वाधिक महत्त्वं दिलं जात आहे ते म्हणजे कोकण रेल्वेला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं मुंबईकरांचे पाय गावाकडे वळतात.   

2/8

कोकणात जाणाऱ्यांची मोठी संख्या

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

इथं त्यांना गावाकडे नेण्याची जबाबदारी असते ती म्हणजे कोकण रेल्वे आणि लाल परी अर्थात एसटीची. सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची मोठी संख्या पाहता रेल्वे विभागाकडून मुंबई ते कुडाळदरम्यान 18 गणपती विशेष अतिरिक्त अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

3/8

266 जादा गाड्या

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

यंदाच्या वर्षी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून कोकणाकडे 208 आणि पश्चिम रेल्वेकडून 40 गणपती विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं हा एकूण आकडा 266 गाड्यांवर पोहोचला आहे.   

4/8

गाडी क्रमांक...

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

गाडी क्रमांक 01185 एलटीटी - कुडाळ 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. एलटीटीवरून रात्री 12.45 वाजता या गाडीला प्रवास सुरु होऊन तो सकाळी 11.30 वाजता कुडाळ येथे पूर्ण होईल.   

5/8

कोणकोणत्या वारी रेल्वे ?

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

कुडाळवरून दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी गाडी क्रमांक 01186 चा प्रवास सुरु होईल. दुपारी 12.10 मिनिटांनी ही गाडी कुडाळमधून निघून रात्री 12.35 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.   

6/8

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग येथे ही गाडी थांबेल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.   

7/8

पश्चिम रेल्वे

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

पश्चिम रेल्वेकडून गाडी क्रमांक 09009/09010 मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी मार्गावर 30 फेऱ्यांचा प्रवास करेल. तर, गाडी क्रमांक 09108/09017 उधना ते मडगाव विशेष गाडीच्या 6 फेऱ्या, गाडी क्रमांक 09150/09149 विश्वामित्री- कुडाळ गाडीच्या 4 फेऱ्या प्रवाशांसाठी सुरु असतील.   

8/8

तारीख लक्षात ठेवा

konkan railway ganpati special trains to konkan latest upadates reservation process news

27 जुलै 2023 पासून वाढीव 40 फेऱ्यांसाठीचं आरक्षण सुरु होणार असून, प्रवाशांनी तारीख लक्षात ठेवावी.