Ram Mandir Latest Photos:सुरेख आणि सुंदर नक्षीकाम असलेल्या अयोध्या राम मंदिरातील हे नवीन फोटो तुम्ही पाहिलेत का?

161 फूट उंची, भव्य गाभारा; असं असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर! 

Jan 15, 2024, 14:13 PM IST

Ram Mandir Latest Photos: आयोध्या राम मंदिर गाभाऱ्यातील व राम मंदिर परिसरातील नवीन फोटो तुम्ही पाहिलेत का ? 

1/8

 श्री राम मंदिर लोकार्पणसाठी संपूर्ण आयोध्या नगरी सज्ज आहे. श्रीराम मंदिर पाहण्याठी भाविक 22 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत.  

2/8

लोकार्पण सोहळा

22 जानेवारी 2024ला  राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी जोषात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरातील रामाच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे.

3/8

राम मंदिरातील गाभाऱ्याचे तसंच मंदिर परिसरातील काही  फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंद्वारे राम मंदिरातील भव्यतेचा आणि सौंदर्याचा अंदाज बांधता येतोय.   

4/8

मंंदिरातील गाभारा

हे राम मंदिरीतील गाभाऱ्याचे दृश्य आहे. यात भिंतीवर देवीदेवतांचे शिल्प कोरलं आहे. 

5/8

नक्षीकाम

राम मंदिरातील खांबावरील नक्षीकाम, आजुबाजूच्या परिसरातील सुंदर दृश्यांचे फोटो राम मंदिर समितीने शेअर केले  आहेत. या फोटोंद्वारे मंदिरातील आतील भागाचे दृश्य दिसतायत.   

6/8

नागर शैलीतील बांधकाम

नागर शैलीत बांधलेलं हे श्री रामांच मंदिर 3 मजल्यांच आहे. मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार मुख्य गाभाऱ्यात श्री रामांची मूर्ती तर पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असणार आहे.

7/8

राम मंदिरात 5 हॉल असणार आहेत, यात नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना  आणि कीर्तन मंडप आहे. 

8/8

ऐतिहासिक विहीर (सीता कुप)

राम मंदिर परिसरात एक ऐतिहासिक विहीर (सीता कुप) आहे, जी प्राचीन काळापासून या ठिकाणी आहे. याशिवाय, 25,000 लोकांची क्षमता असलेले तीर्थयात्री सुविधा केंद्र बांधण्यात येणार आहे. यात भक्तासांठी वैद्यकीय सुविधा आणि लॉकरची सुविधाही उपलब्ध असणार आहे.