मुलीच्या भविष्यासाठी 'लेक लाडकी' योजनेतून मिळणार 1 लाख रुपये, कशी करायची नोंदणी? जाणून घ्या

lek Ladaki Scheme: महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2023 च्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 2.56 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 1.71 कोटी केशरी, 62.60 लाख पिवळे शिधापत्रिका आहेत. म्हणजेच 2.3 कोटी कुटुंबांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

| Oct 11, 2023, 09:52 AM IST

lek Ladaki Scheme: एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल. जर कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना मिळेल. जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.

1/10

मुलीच्या भविष्यासाठी 'लेक लाडकी' योजनेतून मिळणार 1 लाख रुपये, कशी करायची नोंदणी? जाणून घ्या

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

lek Ladaki Scheme : महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्मल्यानंतर 1 लाख 1 हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे. या योजनेचे नाव 'लेक लाडकी' योजना आहे. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. 

2/10

माझी कन्या भाग्यश्री

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

यासोबतच राज्य सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. 

3/10

अर्थसंकल्पात घोषणा

मार्चमध्ये मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने याची घोषणा केली होती. त्याचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 

4/10

18 वर्षांची होईपर्यंत लाभ

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

या योजनेत गरीब कुटुंबांना त्यांची मुलगी जन्मल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्यात ही रक्कम दिली जाईल. मुलींचा जन्मदर वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

5/10

कोणाला मिळेल लाभ

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा मुलींना शासकीय योजनेचा लाभ दिला जाईल.

6/10

1 एप्रिल 2023 नंतर जन्म

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल. जर कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना मिळेल. जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.

7/10

2.3 कोटी कुटुंबांना लाभ

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2023 च्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 2.56 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 1.71 कोटी केशरी, 62.60 लाख पिवळे शिधापत्रिका आहेत. म्हणजेच 2.3 कोटी कुटुंबांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

8/10

5 टप्प्यात रक्कम

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

मुलीच्या जन्मावर 5000 रुपये मिळतील. शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये, सहावी वर्गात जाण्यासाठी 7000 रुपये, अकरावीला जाण्यासाठी 8000 रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये दिले जाणार आहेत. 

9/10

ही 9 कागदपत्रे आवश्यक

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

पिवळा किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका, मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, निवासी, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ई - मेल आयडी आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. 

10/10

तीन महत्त्वाच्या गोष्टी

lek Ladaki Yojana Girl Child Birth maharashtra Government Give 1 Lakh Priy Mulgi Mazi kanya Bhagyashree

दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर, आई किंवा वडिलांनी नसबंदी ऑपरेशन करणे अनिवार्य आहे. मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.