2024 मध्ये प्रत्येक महिन्यात किती सुट्ट्या? 9 Long Weekends, 'या' महिन्यात तर तब्बल 13 सुट्ट्या

List of Public Holidays In India Long Weekends In 2024: नव्या वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर लाँग विकेण्डला काही विशेष प्लॅन करता येईल का याचं नियोजन जानेवारीपासूनच केलं जातं. याच नियोजनात आम्ही तुम्हाला या गॅलरीच्या माध्यमातून मदत करतोय अगदी थोडक्यात दर महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची माहिती घेऊयात...  

| Dec 31, 2023, 14:38 PM IST
1/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

दरवर्षी नवी वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर पहिल्यांदा चर्चा होते ती जोडून आलेल्या सुट्ट्यांची. जोडून आलेल्या सुट्ट्या किती आहेत. रविवार वगळता महिन्यात सुट्ट्या आहेत की नाही हे आपल्यापैकी अनेकजण आवर्जून पाहतात. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान महिन्यात किती अतिरिक्त सुट्ट्या आहेत पाहूयात...

2/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

महाराष्ट्र राज्य शासनानं 2024 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी नुकतीच जाहीर केली. विविध धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या- उत्सवांनिमित्त 24, अतिरिक्त 1 अशा 25 सुट्ट्या राज्य शासनानं जाहीर केल्या.

3/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या या 25 सुट्ट्यांपैकी 9 सुट्ट्या शनिवार आणि रविवारला लागूनच आल्या आहेत. त्यामुळं सुट्ट्यांचा आनंद खऱ्या अर्थानं द्विगुणित झाला आहे. 

4/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

जानेवारी नव्या वर्षातील पहिलीच सुट्टी 26 जानेवारीला आहे. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी शुक्रवारी येत असल्याने पहिल्याच महिन्यात एक्सटेंडेड विकेण्ड मिळणार आहे. जानेवारीत 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. जानेवारीमध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असतील.

5/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

फेब्रवारी महिन्यामध्ये एकच अतिरिक्त सुट्टी आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (इंग्रजी तारखेनुसार) आहे. या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. वर्षातील सर्वात छोटा महिना एकाच अतिरिक्त सुट्टीसहीत जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. फेब्रुवारीमध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असतील.

6/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

मार्च महिन्यामध्ये 3 अतिरिक्त सुट्ट्या असून या तिन्ही सुट्ट्या लाँग विकेण्ड म्हणजेच शनिवारी आण रविवारला लागून आहेत. शुक्रवारी 8 मार्च रोजी महाशिवरात्रीची सुट्टी आहे. त्यामुळे 8 ते 10 मार्च असा 3 दिवसांचा प्लॅन करता येईल.

7/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

मार्च महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच 25 तारखेला धुलिवंदनाची सुट्टी आहे. त्यामुळे शनिवार 23 मार्च, रविवार 24 मार्च आणि 25 मार्च असा प्लॅन करता येईल. याच आठवड्यामध्ये शुक्रवारी म्हणजे 29 मार्चला गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने 29 ते 31 असाही प्लॅन करता येईल. मार्चमध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार आहेत. मार्चमध्ये 5 डेज विकनुसार 13 सुट्ट्या असतील.

8/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

एप्रिल महिन्यामध्येही 3 अतिरिक्त सुट्ट्या आहेत. ज्यामध्ये 9 एप्रिल (गुढीपाडवा), 11 एप्रिल (रमजान ईद) आणि 17 एप्रिल (राम नवमी) या सुट्ट्यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवारी आहे. एप्रिलमध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. एप्रिलमध्ये 5 डेज विकनुसार 11 सुट्ट्या असतील.

9/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

मे महिन्यामध्ये 1 तारखेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनामित्त सुट्टी असेल. ही सुट्टी बुधवारी असेल. तर गुरुवारी, 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असणार आहे. मे महिन्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. मे मध्ये 5 डेज विकनुसार 10 सुट्ट्या असतील.

10/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

जूनमध्ये 15 ते 17 असा 3 दिवसांचा लाँग विकेण्ड मिळेल. यामध्ये 15 तारखेला शनिवार आणि 16 ला रविवार आहे. तर 17 तारखेला बकरी ईदची सुट्टी आहे. जूनमध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार आहेत. जूनमध्ये 5 डेज विकनुसार 11 सुट्ट्या असतील.

11/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

जुलै महिन्यामध्ये बुधवारी, 17 तारखेला मुहर्ममची सुट्टी असणार आहे. या महिन्यात ही एकमेव अतिरिक्त सुट्टी असेल. जुलै महिन्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. जुलै मध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असतील.

12/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन गुरुवारी आहे. म्हणजेच 15 ऑगस्टची सुट्टी गुरुवारी येत आहे. शुक्रवारी एका दिवसाची सुट्टी घेतल्यास 15 ते 18 असा 4 दिवसांचा प्लॅन करता येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये 4 रविवार आणि 5 शनिवार आहेत. ऑगस्टमध्ये 5 डेज विकनुसार 10 सुट्ट्या असतील.  

13/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

सप्टेंबर महिन्यामध्ये गपणती येणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे. तर 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. 14 ते 16 असा लाँग विकेण्ड प्लॅन करता येईल. सप्टेंबर महिन्यामध्ये 5 रविवार आणि 4 शनिवार आहेत. सप्टेंबरमध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असतील.  

14/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

ऑक्टोबरमध्ये 2 तारखेला गांधी जयंतीची सुट्टी असेल. ही सुट्टी बुधवारी आहे. तर 12 तारखेला दसऱ्याची सुट्टी असून ती शनिवारी आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. ऑक्टोबरमध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असतील.  

15/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मीपूजन आहे. तर दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा आणि दीवाळी पाडवा असल्याने सुट्टी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तिन्ही दिवशी सुट्टी असेल. महाराष्ट्र राज्य शासनाकडून 3 नोव्हेंबरला भाऊबीजेची सुट्टी जाहीर केली खरी, पण रविवार असल्यामुळं ती सुट्टीही विक ऑफमध्येच जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 रविवार आणि 5 शनिवार आहेत. ऑक्टोबरमध्ये 5 डेज विकनुसार 10 सुट्ट्या असतील.

16/16

List of Public Holidays in India long weekends in 2024

पुढल्या वर्षी नाताळाची सुट्टी बुधवारी असणार आहे. डिसेंबरमध्ये केवळ ही एकमेव अतिरिक्त सुट्टी असेल. डिसेंबर महिन्यामध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार आहेत. डिसेंबरमध्ये 5 डेज विकनुसार 10 सुट्ट्या असतील.