Maha Shivratri 2023 : महाशिवरात्रीच्या निमित्तानं कोकणात आहात? शंकराच्या या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या
Offbeat Travel : महाशिवरात्रीच्या दरम्यान किंवा एरव्हीसुद्धा तुम्ही या लाल मातीच्या वाटांर जाणार असाल तर एका सुरेख ठिकाणाला नक्की भेट द्या. आता हे ठिकाण कोणतं, तिथं नेमकं कसं जावं याविषयी थोडं जाणून घ्या.
Offbeat Travel : कोकण... महाराष्ट्रातील एक असं ठिकाण जिथं निसर्गाच्या निर्मात्याचा वरदहस्त पाहायला मिळतो. पशुपक्ष्यांच्या अस्तित्वानं म्हणून नका किंवा मग अथांग समुद्राचं देणं म्हणू नका हा कोकण इतका सुंदर, की इथं खुद्द भगवंताचंही अस्तित्वं असल्याचं सांगितलं जातं. अशा या कोकण सफरीवर तुम्ही जाताय का?
maha shivratri 2023

मुंबई- गोवा महामार्गावर असणाऱ्या शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता आपण मात्र संगमेश्वराची वाट घ्यायची. थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये रुग्णालयाच्या समोरूनच डोंगरावर चढणीची वाट दिसते. चांगला डांबरी रस्ता असला तरीही चढ तीव्र आहे. या रस्त्यावर साधारण 3 किमी ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडच्या वाटेवर ऐन गर्द झाडीत आहे हे सप्तेश्वर महादेवाचं मंदिर.
Offbeat Travel destinations

Offbeat Travel places

पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह आणल्याचं लक्षात येतं. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात.
Offbeat Travel

मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळं बांधकाम देखणंसुद्धा आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात.
konkan

30 फूट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. पूर्वेकडे सह्य़ाद्रीची मुख्य रांग आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता आहे.
konkan Offbeat Travel
