'या' राजाच्या होत्या 350 राण्या आणि 88 मुलं, लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी खायचा चिमणीच्या मेंदूपासून बनवलेले औषध
Bhupinder Singh of Patiala : भारतात असे अनेक राजे आणि सम्राट झाले आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध होते. आज आपण अशाच राजाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला 350 राण्या होत्या.
1/10
असाच एक राजा होता पटियाला राज्यातील महाराजा भूपिंदर सिंग जो त्याच्या रंगीबेरंगी स्वभावाने जगभरात प्रसिद्ध होता. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो राजा झाला. 18 वर्षांचा झाल्यानंतर त्यांनी राज्याच पदभार स्विकारला आणि त्याने 38 वर्षे पटियालावर राज्य केलंय. त्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील.
2/10
दिवाण जरमनी दास यांनी त्यांच्या 'महाराजा' या पुस्तकात महाराजा भूपिंदर सिंग यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. या पुस्तकानुसार या राजाने लीला भवन किंवा उत्सव करणाऱ्यांसाठी महाल बांधलं होतं. या महालात एक नियम होता त्यानुसार विवस्त्र इथे लोकांना प्रवेश असायचा. पटियाला शहरातील भूपेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहरदरी बागेजवळ हा महाल बांधला आहे.
3/10
या महालात एक अशी खोलील आहे जिला प्रेम मंदिर असं म्हटलं जातं. ही खोली महाराजांसाठी खास असून तिथे दुसऱ्या लोकांनाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती. या खोलीत राजाच्या सुखसोयींची पूर्ण व्यवस्था असायची. त्याच्या वाड्याच्या एक स्विमिंग पूल होता ज्यामध्ये एकाच वेळी सुमारे 150 लोकांच्या आंघोळ करु शकायचे. याठिकाणी राजा अनेक पार्ट्या करायाचे. असं म्हणतात जेव्हा राजा या स्विमिंग पूलला आंघोळीला जायचा तेव्हा हरमच्या मुलींना नग्नावस्थेत उभं केलं जायचं.
4/10
इतिहासकारांच्या मते, महाराजा भूपिंदर सिंग यांच्याकडे एकूण 365 राण्या होत्या. ज्यांच्यासाठी पटियालामध्ये भव्य राजवाडे बांधण्यात आले होते. या महालांमध्ये राण्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची टीम नेहमी हजर राहायची. या पुस्तकानुसार महाराजांना त्यांच्या 10 पत्नींपासून 83 मुलं होती, त्यापैकी फक्त 53 मुलं जिवंत राहिली.
5/10
6/10
भूपेंद्र सिंह यांनी महालातील महिलांचे कपडे, मेकअप, दागिने इत्यादींसाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक केली होती. हरममधील महिलांना सतत आकर्षक ठेवण्यासाठी ते कपडे आणि दागिने डिझाइन करायचे. महाराजांना आवडेल असा मेकअपवर भर दिला जायचा. एवढंच नाही तर महिलांच्या शरीरात त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्यासाठी फ्रेंच, इंग्लिश आणि भारतीय प्लास्टिक सर्जनचीही नेमणूक करण्यात आली होती. यासाठी एक प्रयोगशाळाही उघडण्यात आली होती.
7/10
महाराजांच्या खोलीत कामुक कलाकृती बनवल्या होत्या. या कलाकृती प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. त्या कलाकृतींमध्ये चित्रित केलेल्या प्रेम आणि लैंगिक जीवनासाठी महाराजांना प्रेरणा मिळायची असं या पुस्तकात सांगण्यात आलंय. विविध आसनांचा सराव करण्यासाठी त्याने आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यात रेशमी तारांनी बनवलेला झुलाही टांगला होता असं म्हणतात.
8/10
9/10
10/10