लाल वादळ मुंबईत धडकणार! पायी चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा कॅमेरात कैद, Photoपाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

सागर आव्हाड, झी मीडिया, नाशिक : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (मार्क्सवादी-Communist Party of India)  पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा (Farmers March) काढण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यापासून (Nashik) या मोर्चाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार जीवा पांडू गावीत यांच्या नेतृत्वाखाली पायी प्रवास करत हे लाल वादळ मुंबई विधान भवनावर (Vidhan Bhavan) धडकणार आहे. 23 मार्चला शेतकरी मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या शेतकऱ्यांच्या व्यथा झी तासच्या पत्रकाराने आपल्या कॅमेरात टिपल्या आहेत. 

Mar 14, 2023, 19:43 PM IST
1/7

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा आत्ता मुंडे गाव या ठिकाणी दाखल झाला आहे. दुपारी जिंदाल कंपनीच्या मैदानावर मोर्चेकर्‍यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वयंपाक बनवला. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

2/7

आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो कष्टकरी, शेतकऱ्यांनी  रविवारी नाशिक (Nashik) इथून पायी चालण्यास सुरुवात केली  (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबईत विधान भवनावर धडकणार आहेत. राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळले आहेत.

3/7

तरुण, वृद्ध सर्वच या मोर्चात सहभागी झाले आहेत. वयाचा विचार न करता आपल्या न्यायसाठी शेतकरी अहोरात्र चालतायत. त्यांची ही व्यथा झी 24 तासचे पत्रकार सागर आव्हाड यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

4/7

दिवसा तळपतं ऊन, रात्री थंडी अशा दुहेरी वातावरणाच्या संकाटाचा सामना करतात हजारो पाय मुंबईच्या दिशेने निघालेत. रस्त्यातच दोन्ही वेळचं जेवण, रात्री एखाद्या आडोशाला झोप, तासनतास चालल्याने पाय दुखले की एकमेकांचे पाय दाबून द्यायचे... असं मन हेलावून टाकणारं दृश्य. 

5/7

अवकाळी पावसाने शेतपिकं पार उद्ध्वस्त केलंय. पीक आलचं तर बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेने तो आता मुंबईच्या दिशेने निघालाय.

6/7

किसान सभेच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. राज्य सरकारकडून बैठकीचा निरोप आला नाही, तर राज्यभरात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय. बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे.

7/7

शेतकऱ्याच्या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला आहे . नाशिक जिल्ह्यातील ठाकरे सेनेने मोर्चातील शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.