Maharashtra Weather : तारखांसह पाहा पुढच्या 5 दिवसांत राज्यातील कोणत्या भागाला पाऊस आणि गारा झोडपणार

Maharashtra Rain : हवामान खात्याच्या या माहितीसोबतच राज्यात सध्या सुरु असणाऱ्या अवकाळीकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. 

Apr 12, 2023, 14:31 PM IST

Maharashtra Weather : स्कायमेटनं सरासरीपेक्षा कमी प्रमाणात यंदा पाऊस होणार असल्याचा दावा केलेला असतानाच, हा दावा फेटाळणारं वृत्त आयएमडीनं प्रसिद्ध केलं. सरासरीच्या 96 टक्के इतका पाऊस यंदाच्या वर्षी होणार असल्याचा दावा आयएमडीनं केला आहे. (Monsoon News)

1/6

maharashtra weather heavy rain and hailstorm predictions in konkan goa Central maharashtra

मार्च महिना संपून एप्रिलचा पहिला पंधरवडा संपायला आला असला तरीही राज्यातून अवकाळी पावसानं काढता पाय घेतलेला नाही. मुंबई वगळता राज्याच्या बहुतांश भागात मागील आठवड्याभरापासून पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळालं. 

2/6

maharashtra weather heavy rain and hailstorm predictions in konkan goa Central maharashtra

येणाऱ्या पाच दिवसांतही हीच परिस्थिती पाहायला मिळणार असल्याच्या आयएमडीच्या वृत्ताला हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दुजोरा देत एक ट्विट केलं. 

3/6

maharashtra weather heavy rain and hailstorm predictions in konkan goa Central maharashtra

ट्विटमधून त्यांनी तारखांनिशी राज्याच्या कोणत्या भागात नेमका पाऊस केव्हा येणार याबाबतची माहिती त्यांनी दिली. 

4/6

maharashtra weather heavy rain and hailstorm predictions in konkan goa Central maharashtra

हवामान विभागाच्या वृत्ताचा हवाला देत होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार पुढील 5 दिवस गोवा, कोरण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावेल. 

5/6

maharashtra weather heavy rain and hailstorm predictions in konkan goa Central maharashtra

12 ते 14 एप्रिल या दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्राला गारपीटीचा तडाखा बसू शकतो. शेतपिकांवर याचे थेट परिणाम होऊ शकतात. 

6/6

maharashtra weather heavy rain and hailstorm predictions in konkan goa Central maharashtra

13 एप्रिल रोजी कोकण आणि 14 एप्रिलला मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी असेल अशी माहिती त्यांनी दिली.