महाविकासआघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्प

आजचं महाविकासआघाडी सरकारनं १०० दिवस पूर्ण केले आहेत.

Mar 06, 2020, 11:51 AM IST

मुंबई : महाविकासआघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार राज्याचं अर्थसंकल्प सादर करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आजचं महाविकासआघाडी सरकारनं १०० दिवस पूर्ण केले आहेत. त्यामुळे हा योगायोग असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. पहिल्या अर्थसंकल्पातून अजित पवार कोणती खूशखबर देणार, याकडे लक्ष लागलं आहे.

1/5

राज्यातील शेतकरी, महिला, तरूणांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.   

2/5

एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.   

3/5

राज्यात मंदीमुळे उद्योगधंदे अडचणीत आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था तणावाखाली आल्याचंही त्यांनी सांगितलं.  

4/5

शिवाय मुंबई मराठी संग्रहालयाला ५ कोटींचं अनुदान देण्यात आलं. अशा अनेक प्रकारचे महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.   

5/5

सर्व शाळांना इंटरनेट जोडण्याचा निर्णय देखील अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदांच्या शाळेचा दर्जा देखील वाढवण्यात येणार आहे.