IndependanceDay2024: भारताच्या 'या' जिल्ह्यातील सीमाभागांना एकदा नक्की भेट द्या

15 ऑगस्टला खास भारताच्या सीमाभागांना भेट देण्यासाठी पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. 

Aug 08, 2024, 17:15 PM IST

येत्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पुर्ण होत आहेत. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला भारताच्या सीमेवर लष्कराकडून शहिदांना मानवंदना देण्यात येते. 

1/8

भारताला लागून पाकिस्तान,चीन, श्रीलंका आणि अफगणिस्तान असे काही देश आहेत.पाकिस्तानने बऱ्याचवेळा छुप्या मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.  

2/8

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि काश्मीर यांना जोडूनच पाकिस्तानची सीमा लागते.  

3/8

अटारी-वाघा सीमारेषा

अमृतसर आणि लाहोरची सीमा म्हणजे वाघा बॉर्डर. स्वातंत्र्य दिनाच्या  दिवशी या ठिकाणी लष्कराकडून शक्तीप्रदर्शन केलं जातं. स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त तुम्ही सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत या ठिकाणाला भेच देऊ शकता. 

4/8

हुसैनीवाला-गंडा सिंग वाला सीमा

ही भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा आहे. पंजाबच्या कसूर जिल्हयातील या सीमेवरुन लाहोर फक्त 58 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी शहिदभगत सिंह यांचे स्मारक आहे.   

5/8

सादीकी-सुलेमांकी सीमा

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी येथे परेड पाहण्यासाठी देशातील विविध ठिकाणाहून लोक भेट देतात. 

6/8

मुनाबाओ सीमा

राजस्थानमधील बारमेर आणि पाकिस्तानच्या इस्लामाबाद यांना जोडणारी ही सीमारेषा आहे. ही अशी एक सीमा आहे जीचे गेट 12 वर्षातून एकदाच खोलले जातात.   

7/8

नाथू ला सीमा

भारत आणि चीनला जोडणारी ही सीमा सिक्कीम राज्यात आहे. या ठिकाणाहून तिबेटचं पठार काही अंतरावरच आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला गंगटोकवरुन जावं लागतं त्याचबरोबर तुमच्याकडे भारतीय असल्याचा पुरावा आवश्यक आहे.   

8/8

अक्साई चीन

ही सीमारेषा लडाख, तिबेट आणि चीनच्या भूभागालगत आहे. अक्साई चीन सीमाभाग आणि अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा सीमालगत भाग संवेदनशील असल्याने सहसा या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला जातो.