व्हर्जिनीटी कधी गमावली? आई मलायकाच्या प्रश्नावर अशी होती अरहानची रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान सध्या सोशल मीडियावर त्याच्या 'डंब बिरयानी' या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. यात तो त्याच्या तीन मित्रांसोबत दिसत आहे. यावेळी खान कुटुंबाविषयी आपल्याला अनेक गोष्टी कळत आहे. तर त्याचा आता दुसरा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

| Apr 17, 2024, 14:23 PM IST
1/7

मलायका अरोरा आणि अरहान

'डंब बिरयानी' चा दुसरा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मलायका अरोरा दिसत आहे. 

2/7

मलायकाचा अरहानला प्रश्न...

या प्रोमोमध्ये अरहानच्या शोमध्ये मलायकाची यावेळी एन्ट्री पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच मलायका अरहानला प्रश्न विचारताना दिसते की त्यानं त्याची व्हर्जिनीटी कधी गमावली? 

3/7

अरहानची रिअॅक्शन

मलायकाचा प्रश्न ऐकताच अरहान सुरुवातीला शांत झाला आणि त्यानंतर हळू आवाजत व्वाव म्हणाला. मलायका तिथे न थांबता त्याला या प्रश्नाचं उत्तर विचारता दिसते तर अरहानची रिअॅक्शन ही अशी असते की आता काय... 

4/7

मलायकालाच विचारला प्रश्न

मलायकाचा हा प्रश्न ऐकताच अरहान तिनं पुढे काही विचारायला नको म्हणून थेट तिलाच उलटं प्रश्न विचारला की 'तू लग्न कधी करणार आहेस?' आता या प्रश्नावर मलायका काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

5/7

मलायका आणि अर्जुन

मलायका गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांना अनेकदा त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला असून त्यांनी यावर कधीही कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. 

6/7

अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायकानं दिली होती प्रतिक्रिया

मलायकानं करीनाच्या 'वॉट वूमन वॉन्ट'मध्ये सांगितलं की "माझ्यासाठी आनंद हा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मला इतका मोठा निर्णय घेण्याची गरज असली तरी देखील मी तयार आहे. आम्ही अनेक गोष्टींचा विचार केला आणि गरजेच्या आणि कोणत्या न माहित असलेल्या गोष्टींची तुलना केली."

7/7

घटस्फोटाच्या निर्णयाविषयी पुढे मलायका म्हणाली...

"सगळ्या गोष्टींचा विचार करत आम्ही विभक्त होणं हा योग्य पर्याय असल्याचं ठरवलं. त्याचं कारण म्हणजे आम्ही विभक्त झालो तर चांगली व्यक्ती राहू. कारण आम्ही दोघं एकमेकांना आनंदी ठेवू शकत नव्हतो. त्यामुळे आमच्या आजुबाजूला असलेल्या सगळ्या लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होत होता."