हिंदू राजाने वसवलेलं मालदिव मुस्लिम राष्ट्र कसं झालं? जाणून घ्या

Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन सुरु झालेला वाद थांबवण्याचे नाव घेत नाहीये. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टिप्पण्यांचा मुद्दा जोर धरू लागला आहे. तिथल्या सरकारने याप्रकरणी तीन मंत्र्यांना तडकाफडकी निलंबित केले असले तरी, भारतीयांचा संताप काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.

Jan 08, 2024, 16:59 PM IST
1/7

pm modi maldives

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर काही दिवसांनी, शेजारील देश मालदीवच्या काही मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले होते. तसेच भारत श्रीलंकेसारख्या छोट्या देशाप्रमाणे पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हटलं होतं. त्यानंर भारतात संपाताची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरही #BoycottMaldives ट्रेंड सुरु आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मालदीववर एकेकाळी हिंदू राजांची सत्ता होती.

2/7

maldives history

जर आपण मालदीवचा इतिहास पाहिला तर हा देश एकेकाळी हिंदू आणि बौद्ध धर्माच्या लोकांचा देश होता. मालदीवचा इतिहास 2500 वर्षांहून अधिक जुना आहे.

3/7

maldives gujarati

या देशातील सर्वात प्राचीन रहिवासी बहुधा गुजराती होते जे 500 इसवीसनपूर्व भारतातील कालीबंगा येथून श्रीलंका आणि नंतर मालदीवमध्ये पोहोचले. मालदीवचे पहिले रहिवासी ढेवीस म्हणून ओळखले जात होते. 

4/7

Hindu Kings on the Maldives

इतिहासानुसार, मालदीववर हिंदू राजांनी राज्य केले आहे. तमिळ चोल राजांनीही काही काळ मालदीववर राज्य केले. याचा पुरावा येथील बोट बांधण्याच्या पद्धती आणि चांदीच्या नाण्यांवरून मिळू शकतो. 

5/7

muslim country

12व्या शतकात या मालदीवमध्ये मोठा बदल सुरू झाला. अरब व्यापार्‍यांच्या आगमनानंतर देशाचे हळूहळू मुस्लिम राष्ट्रात रूपांतर झाले. या अरब व्यापार्‍यांच्या प्रभावाखाली येथील राजा व प्रजा इस्लाम धर्म स्वीकारू लागली.

6/7

british at Maldives

माहितीनुसार, 20 व्या शतकापर्यंत मालदीवमध्ये 6 इस्लामिक पिढ्यांचे राज्य होते. त्याच वेळी इंग्रजांनीही या देशावर राज्य केले. मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत हा पहिला देश होता ज्याने त्याला मान्यता दिली.

7/7

Constitution of the Maldives

मात्र, तोपर्यंत या देशाचे मुस्लिम राष्ट्रात रूपांतर झाले होते. आता इथला अधिकृत धर्म इस्लाम आहे. येथील 98 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. गैरमुस्लिमांना येथे नागरिकत्व देता येणार नाही, असेही मालदीवच्या घटनेत नमूद आहे. येथील सरकारी नियमही इस्लामिक कायद्यावर आधारित आहेत. (सर्व फोटो: रॉयटर्स)