वयाच्या ४३व्या वर्षी मल्लिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा

मल्लिका, सौंदर्य आणि बरचं काही 

Feb 03, 2020, 13:25 PM IST

मुंबई : वयाच्या ४३व्या वर्षी देखील बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या अदा घायाळ करणाऱ्या आहे. मल्लिका अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. संतुलित आहार आणि योगा मध्ये तिच्या सौंदर्याचे रहस्य दडलं आहे. मल्लिका गेल्या काही दिवसांपासून सतत स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो

1/5

रोज योगा करते मल्लिका

रोज योगा करते मल्लिका

४३ वर्षीय मल्लिका म्हणते, 'गेल्या ६ वर्षांपासून मी अयंगर योगाचा अभ्यास करत आहे. यामुळे मला प्रचंड आनंद मिळतो. शिवाय योगामुळे मानसिक आरोग्य देखील चांगलं राहण्यास मदत होते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.' अशाप्रकारे तिने योगाचे महत्त्व पटवून दिले. 

2/5

अयंगर योगाचे फायदे

अयंगर योगाचे फायदे

अयंगर योगाचे फायदे सांगताना मल्लिका म्हणाली, 'हे योगासन नियमितरित्या केल्यास तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकता. अयंगर योगा आपल्याला सशक्त बनवतो.' अशाप्रकारे तिने अयंगर योगाचे महत्त्व सांगितले. 

3/5

गोड खात नाही मल्लिका

गोड खात नाही मल्लिका

अयंगर योगा करण्यास सुरू केल्यानंतर मल्लिकाने गोड खाण्यास बंद केले. तिला गोड फार आवडतं. पण चांगल्या आरोग्यासाठी ती गोड खात नाही. 

4/5

मल्लिकाचा आहार

मल्लिकाचा आहार

मल्लिका तिच्या आहारात कायम शाकाहरी पदार्थ खाते. घरी तयार केलेले पदार्थ तिला फार आवडतात. 

5/5

मल्लिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा

मल्लिकाच्या  घायाळ करणाऱ्या अदा

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मल्लिका अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.