Samsaptak Yoga : मंगळ गोचरमुळे अशुभ संसप्तक योग! 5 राशीच्या लोकांनी राहवं सावधान, अन्यथा...

Samsaptak Yoga 2023 Negative Effects : 1 जुलैला पहाटे 02.37 वाजता मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहे. या परिस्थितीत कुंभ राशीत शनी आणि सिंह राशीत मंगळ यामुळे कुंडलीत अशुभ संसप्तक योग तयार होत आहे. 

Jun 23, 2023, 09:40 AM IST

Mangal Shani Samsaptak Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थिती बदलाला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीमुळे जाचकाच्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. काही दिवसानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला 1 जुलै ला मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सिंह उग्र स्थितीत असणार आहे. 

 

1/6

मंगळ गोचर

सध्या शनी कुंभ राशीत आहेत. त्यामुळे मंगळ आणि शनी समारोसमोर येणार आहे. अशा परस्थितीत संसप्तक योग तयार होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा अतिशय अशुभ योग आहे. यामुळे 5 राशींवर आरोग्याची समस्या आणि आर्थिक संकट कोसळणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.

2/6

मेष (Aries)

संसप्तक योगामुळे मेष राशीच्या लोकांना अधिक सावधान राहावं लागणार आहे. या लोकांनी या काळात वाहन जपून चालवावी. प्रेम संबंधामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या जाणवणार आहेत. पोटाचा विकार त्रास देऊ शकतो. या दिवसांमध्ये खाद्यपदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा. 

3/6

कर्क (Cancer)

मंगळ गोचरमुळे तयार झालेला संसप्तक योगामुळे कर्क राशींना सर्वाधिक त्रास होणार आहे. 1 जुलै ते 18 ऑगस्ट दरम्यान या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाही तर होणारी कामं पण बिघडतील. कामाच्या ठिकाणी कुठल्याही वादविवादात अडकू नका. वेळेवर काम पूर्ण करा. कमी बोलणं हेच या काळात तुमच्यासाठी चांगल ठरणार आहे. 

4/6

कन्या (Virgo)

मंगळ गोचरमुळे तयार झालेल्या संसप्तक योगामुळे या राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे  1 जुलै ते 18 ऑगस्टदरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुमच्यावर कर्ज मागण्याची वेळ येऊ शकते. गुंतवणूक जपून करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तणातणावर दूर ठेवण्यासाठी योग नक्की करा. 

5/6

मकर (Capricorn)

मंगळ आणि शनी यांच्या स्थितीमुळे संसप्तक योगाचा दुष्परिणाम मकर राशीवर दिसून येणार आहे. या काळात वाहन जपून वापरा. कुटुंबात वादविवादामुळे मन अशांत असेल. उत्पन्नापेक्षा या काळात अधिक खर्च होणार आहे. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या. 

6/6

मीन (Pisces)

मंगळ आणि शनी यांच्या स्थितीमुळे निमार्ण झालेल्या अशुभ योगाचा परिणाम मीन राशीवर दिसून येणार आहे. कामाच्या ठिकाणी या लोकांना सहकार्य लाभणार नाही.  1 जुलै ते 18 ऑगस्ट  हा तुमच्यासाठी सर्वाधिक कठीण काळ असणार आहे. विचार, वागणूक आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा.  अन्यथा समाजात तुमची प्रतिष्ठा पणाला लागेल. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x