Manohar Joshi Passed Away : शिवसेनेचा 'कोहिनूर' हरपला! सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री...

Manohar Joshi Passed Away :  बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, शिवसेनेचा कोहिनूर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात जगाचा निरोप घेतला.  मनोहर जोशी यांच्या राजकीय कारकीर्द एक नजर टाकूयात. 

Feb 23, 2024, 09:21 AM IST
1/9

मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला होता. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं. 

2/9

मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाली. त्यानंतर ते शिवसेनेत सहभागी झाले. 1967 ते 1972 मध्ये ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. 

3/9

संघटन कौशल्य आणि तळागाळातील लोकांशी संपर्क यामुळे ते काही वेळातच लोकांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलं. यानंतर ते 1976 ते 1977 त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवलं. 

4/9

मनोहर जोशी 1972 ते 1989 मध्ये शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडणून आले. 

5/9

नंतर 1990 ते 1991 मध्ये त्यांनी विधानसभा विरोदी पक्षनेतेची जबाबदारी स्विकारली. 

6/9

मनोहर जोशी यांनी 1995 - 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषावलं. 

7/9

1999 - 2004 मध्ये ते लोकसभा खासदार म्हणून निवडल्या गेले.  

8/9

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 2002-04 मध्ये त्यांच्यावर लोकसभा अध्यक्षाची जबाबदारी दिली. 

9/9

राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे राजकारणात काम केलं.