मासिक पाळी ही अभिमानाची गोष्ट- मानुषी छिल्लर

Feb 07, 2018, 16:40 PM IST
1/6

manushi chillar says we should not be ashamed of periods

manushi chillar says we should not be ashamed of periods

नवी दिल्ली पालिका परिषदेने आणि मिस वर्ल्ड संघटनेने एकत्रितपणे कन्वेंशन सेंटरमध्ये ब्युटी विथ पर्पज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान एनडीएमसी कन्वेंशन सेंटरमध्ये एनडीएमसी शाळेतील ३०० हुन अधिक विद्यार्थी आणि महिला शिक्षकांशी संवाद मानुषी छिल्लरने संवाद साधला. 

2/6

manushi chillar says we should not be ashamed of periods

manushi chillar says we should not be ashamed of periods

यावेळी ती मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलली. मासिक पाळी ही अत्यंत सामान्य आणि शारीरीक प्रक्रीया आहे. याबद्दल लाजण्यासारखे आणि वेगळे वाटून घेण्यासारखे काहीच नाही.  याबद्दलच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर मासिक पाळीकडे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे.

3/6

manushi chillar says we should not be ashamed of periods

manushi chillar says we should not be ashamed of periods

तिने पॅडबद्दल विद्यार्थ्यींनींशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि तरुणींनी, महिलांनी याबद्दल खुलेपणाने बोलावे, असे सांगितले. इतकंच नाही तर या माहितीचा प्रसार होणे गरजेचे असल्याचे मानुषीने सांगितले.

4/6

manushi chillar says we should not be ashamed of periods

manushi chillar says we should not be ashamed of periods

यामुळेच आपण स्वच्छ भारतातील स्वस्थ महिला म्हणून ओळखल्या जावू. जूटपासून बनलेले पर्यावरण स्नेही सॅनिटरी नॅपकीन्स सर्वात उत्तम आहेत. जूट जगभरात सहज उपलब्ध आहे. हे नैसर्गिक तंतूंनी बनलेले असल्याने पर्यावरणासाठी लाभदायी आहे.

5/6

manushi chillar says we should not be ashamed of periods

manushi chillar says we should not be ashamed of periods

नवी दिल्ली हे देशाचे हृदय असून भारत सरकारचे प्रमुख प्रशासकीय, न्यायिक आणि विधायी स्थळ आहे. आजचा हा क्रांतिकारक संदेश देशातील अधिक लोकांपर्यंत पोहचेल, तितके मासिक पाळीविषयीच्या समजूती दूर होण्यास मदत होईल.

6/6

manushi chillar says we should not be ashamed of periods

manushi chillar says we should not be ashamed of periods

कार्यक्रमात मिस वर्ल्ड सटेफि नी डेल वेली, मिस वर्ल्ड (युरोप) जयना हिल आणि अन्य देशातील मिस वर्ल्ड उपस्थित होत्या.