तुमच्या समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र घालतात का, कुंकू लावतात का? मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणातील प्रश्न

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणा सूचना सरकारने जारी केल्या आहेत.  राज्य सरकारनं सर्व विभागीय आयुक्त, नोडल अधिकारी आणि जिल्हाधिका-यांना यासंबंधी जीआर काढत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. 

Jan 04, 2024, 18:44 PM IST

Maratha Reservation Survey : राज्य सरकारनं आज मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं आज मोठं पाऊल टाकलंय. मराठा समाजाच्या सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. सर्वेक्षणाअंतर्गत मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासलं जाणार आहे. विशेष म्हणजे 7 दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

1/7

तुमच्या समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र घालतात का, कुंकू लावतात का?  

2/7

तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का?

3/7

घरी कुणी राजकारणात आहे किंवा होतं का?   

4/7

घरी फ्रिज, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर,लॅपटॉप आहे का ?

5/7

व्यवसाय काय करता ?

6/7

तुमचं शिक्षण किती ? 

7/7

घर किती मोठे आहे ?