नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

Feb 19, 2020, 14:43 PM IST
1/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

कलेप्रती समर्पक असणारी एक अभिनेत्री गेल्या काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. सोशल मीडियावर तिच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण चाहत्यांना पाहण्याची संधी मिळाली. 

2/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री म्हणजे तन्वी पालव. 

3/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

'जावई विकत घेणे आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या तन्वीचा विवाह मल्याळम अभिनेता आणि गायक सिद्धार्थ मेनन याला आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन दिलं. 

4/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

तन्वी आणि सिद्धार्थचं लग्न अतिशय खास ठरलं. कारण, या निमित्ताने दोन राज्य, दोन संस्कृती आणि अर्थातच दोन मनं जुळली गेली होती. 

5/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

तन्वी ही मुळची महाराष्ट्रातील, तर सिद्धार्थ हा मुळचा केरळचा. त्यामुळे केरळ आणि महाराष्ट्राचं अनोखं नातं या लग्नाच्या निमित्ताने जोडलं गेलं. 

6/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

खास पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मुख्य म्हणजे या विवाहसोहळ्यामध्ये दाक्षिणात्य संस्कृतीसोबतच मराठमोळ्या संस्कृतीचंही दर्शन घडलं. 

7/7

नांदा सौख्य भरे! पाहा अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यातील सुरेख क्षण

तन्वी आणि सिद्धार्थच्या लग्नाला काही दिवस उलटले असले तरीही त्यांच्या या खास लग्नसमारंभाची सध्याही चर्चा सुरु आहे. (सर्व छायाचित्रे - इन्स्टाग्राम/ तन्वी पालव)