Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...

Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे. 

Jun 07, 2023, 12:54 PM IST

Chanakya Niti Tips For Husband and Wife in Marathi: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य यांनी नवविवाहित नवरा बायकोच्या नातेसंबंधावर काही गोष्टी सांगितल्या आहेत.

1/5

आदर

वैवाहिक जीवन चांगलं करण्यासाठी दोन्ही व्यक्तींमध्ये प्रेम आणि परस्पर आदर असणं महत्वाचं आहे, असं चाणक्य म्हणतात.

2/5

अहंकार

पतीने कधीही कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये कारण जर त्यांनी इतरांबद्दल अहंकार दाखवला तर नातं बिघडू शकतं.

3/5

संयम

विवाहित जोडप्यांनी त्यांचं नातं टिकवून ठेवण्याचं साधन म्हणून सतत संयम दाखवणं अत्यावश्यक आहे. सर्व गोष्टी ठिक होतील यावर कायम विश्वास ठेवा.

4/5

विश्वास

नातेसंबंधातील खासगी गोष्टी शेअर केल्यानं पती-पत्नीमधील विश्वास खराब होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

5/5

समजूत घ्या

आपल्या जोडीदाराला समजून घ्या. त्याचा स्वभाव तुमच्यापेक्षा वेगळा असू शकतो. त्यामुळे जोडीदाराला समजून घेऊन मगच एखाद्या गोष्टीवर रिअॅक्ट करा.