Tata, Mahindra ला मारुती देणार नवं आव्हान; जबरदस्त कार लाँच करण्याच्या तयारीत; 35KM चा मायलेज अन् 6 एअरबॅग्स

सीएनजी व्हेरियंट 30 ते 35 किमीपर्यंत मायलेज देऊ शकतं. कंपनीचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हेरियंट 25.75 किमी/लीटर मायलेज देण्यात सक्षम आहे.   

Jun 09, 2024, 21:22 PM IST

सीएनजी व्हेरियंट 30 ते 35 किमीपर्यंत मायलेज देऊ शकतं. कंपनीचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हेरियंट 25.75 किमी/लीटर मायलेज देण्यात सक्षम आहे. 

 

1/7

मारुती सुझुकीने नुकतंच घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध कार Maruti Swift च्या नव्या फोर्थ जनरेशन मॉडेलला लाँच केलं होतं. कंपनीने 6.49 लाख किंमतीत कार लाँच केली आहे.   

2/7

सध्या कंपनीने फक्त पेट्रोल इंजिनसह कारला बाजारात उतरवलं आहे. या कारमध्ये नव्या Z सीरिजच्या 1.2 लीटर पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे.   

3/7

आता कंपनी Swift CNG च्या लाँचिंगची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. ही कार इतर सेगमेंटच्या तुलनेत जास्ता मायलेज देईल अशी आशा केली जात आहे.   

4/7

मीडिया रिपोर्टनुसार, सीएनजी व्हेरियंट 30 ते 35 किमीपर्यंत मायलेज देऊ शकतं. कंपनीचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हेरियंट 25.75 किमी/लीटर मायलेज देण्यात सक्षम आहे.   

5/7

Swift CNG ला कंपनी VXI व्हेरियंटमध्ये सादर करु शकते. ज्याची किंमत पेट्रोल व्हेरियंटच्या तुलनेत 90 हजार रुपये जास्त असू शकते. याच्या VXI व्हेरियंटची किंमत 7.30 लाख आहे.   

6/7

नव्या मारुती स्विफ्टमध्ये 9 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील भागात एसी वेंट्स, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल असे फिचर्स मिळतात.  

7/7

ही कार आधीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. याच्या सहाही व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलही मिळतो.