Mass Marriage : ये मेरा इंडिया.... हिंदू ,मुस्लिम, बौद्ध आणि सर्व धर्माची लग्न लागली एकाच मांडवात
हिंदू ,मुस्लिम, बौद्ध आणि सर्व धर्माची लग्न एकाच मांडवात लागली आहेत. यावेळी नविन जोडप्याला संसारासाठी आवश्यक असलेल्या वस्तु देखील भेट म्हणून देण्यात आल्या.
Mass Marriage : भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे वांधव आहेत. अशी प्रतिज्ञा शाळेत घेतली जाते. भारतीय एकात्मेचे दर्शन घडवणारा अनोखा विवाह सोहळा परभणीत रंगला आहे. हिंदू ,मुस्लिम, बौद्ध आणि सर्व धर्माची लग्न एकाच मांडवात लागली आहेत. परभणीत हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळा पार पडला. समाज कल्याण आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकाराने हा विवाह सोहळा पार पडला.