पतीसाठी परपुरुषासोबत संबंध; असिस्टंटने मारली कानशिलात, मीना कुमारी-कमाल अमरोही यांच नातं Toxic Relationship

लग्नाबाबत प्रत्येक मुलीला कुतुहल असते. तिला कायमच आशा असते की, लग्नानंतरच आपलं जीवन हे आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असेल. पण जर पती कमाल अमरोहीसारखा असेल तर त्या महिलेची स्थिती ही मीना कुमारीसारखे असेल यात शंका नाही. मीना आणि कमाल यांच्यातील नातं इतकं टॉक्सिक होतं की, प्रत्येक रिलेशनशिपकरिता हा सर्वात मोठा धडा असेल. 

| Aug 09, 2024, 20:56 PM IST

जीवनात सगळं असेल जसं की, पैसा, ऐश्वर्य आणि चांगली पत्नी, पण या सगळ्यात जेव्हा अहंकार आणि स्वार्थ हावी होतो तेव्हा... तेव्हा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. असंच काहीसं कमाल अमरोही यांच्यासोबत घडलंय. कमाल यांनी हिंदी सिनेसृष्टीला दिलेल्या सिनेमांचं आजही कौतुक होतंय. मास्टरपीस म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहिलं तर मनापासून शब्द बाहेर पडतात की, असा जोडीदार देव कुणालाच देऊ नये. 

विवाहित असूनही 15 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मीना कुमारी यांच्याशी लग्न केलं. पण नंतर प्रेमाचं नाव देऊन संपूर्ण आयुष्य नर्क बनवून टाकलं. अशी एकच व्यक्ती वागू शकते ज्याला आपल्यासमोर सगळ्या गोष्टी तुच्छ आणि कमी वाटू शकतात. ही गोष्ट कमाल आणि मीना कुमारी यांच्या जीवनासाठी अगदी तंतोतंत खरी ठरु शकते. या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला टॉक्सिक मॅरिड लाइफ म्हणजे काय याची जाणीव होईल. असं नातं कुणा महिलेने सहन करणे गरजेचे आहे का?

1/7

लग्न केलं ते प्रेम म्हणून नाही तर...

कमाल यांना अशी पत्नी हवी होती जी कायमच घरी राहिल आणि तिची ओळख ही तिचा पती असेल. पण मीना कुमारी या कोणत्याच अपेक्षा पूर्ण करु शकल्या नाहीत. त्या एक सर्वोत्तम अभिनेत्री तर होत्या ज्यांनी त्यांच्या लहान वयातच कामाला सुरुवात केली होती. कमाल यांनी मीना कुमारी यांना प्रेमाच्या जाळ्यात ओडून त्यांच्याशी लग्न केलं. पण त्या नात्याला काहीच अर्थ नाही. 

2/7

मीना कुमारी यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न

मीना कुमारी यांना काम करायचं होतं. पण कमाल यांचा विरोध होता. अखेर खूप प्रयत्न करुन तिला परवानगी मिळाली पण 6.30 च्या आत तिने घरी येणे अपेक्षित होते. एवढंच नव्हे तर कमाल यांनी तिला आपल्याच कारने प्रवास करण्याची सक्ती घातली आणि तिच्या मेकअपरुममध्ये कुणीही परपुरुष येणार नाही. या सगळ्यात कुठेच प्रेम नव्हतं.  लग्न करायचं आणि समोरच्या व्यक्तीच्या जीवनावर कंट्रोल मिळवायचं. अगदी कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे मीना कुमारी यांचं आयुष्य झालं होतं. असं आयुष्य कुणाला हवं असतं. ही टॉक्सिक नातं प्रेमाने सुरु झालं असलं तरीही त्यामध्ये प्रेम कुठेच नसतं. 

3/7

कमावूनही हतबल...

लग्नानंतर मीनाने कमावलेल्या प्रत्येक पैशावर कमालने हक्क मिळवला. अन्नू कपूरने आपल्या शोमध्ये एक प्रसंग सांगताना सांगितले होते की, मीना कुमारीने एकदा तिच्या मसाजसाठी दोन रुपये वाढवायला सांगितले, तेव्हा अमरोहीने तिला मसाजची गरज नसल्याचे सांगत तिला फटकारले. त्यामुळे प्रचंड हाणामारी झाली. नंतर कमालने मालीश करणाऱ्या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकले. स्वत: कमवत असूनही अगदी कमी पैशासाठी पतीसमोर हात पसरणे ही गोष्ट मीना कुमारीसाठी लाजिरवाणी होती. हे असं होत असताना ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते हे मानणे कठीण होते. 

4/7

पत्नीच्या यशात आपला अपमान

मीना आणि कमाल एका कार्यक्रमात पोहोचले तेव्हा सोहराब मोदी यांनी 'ही मीना कुमारी आणि हे त्यांचे पती आहेत' असे म्हणत राज्यपालांशी त्यांची ओळख करून दिली. यावेळी कमाल यांना हा आपला अपमान वाटला. तेव्हा कमाल  मोठ्याने म्हणाले की, 'नाही, मी कमाल अमरोही आहे आणि ही माझी पत्नी मीना आहे'. एवढं बोलून तो कार्यक्रमातून निघून गेले आणि मीना लाजत मान खाली घालून तशीच राहिली. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये पुरुष असण्याचा इतका अहंकार असतो की तो आपल्या पत्नीची कीर्ती आणि यशाला आपला अपमान समजू लागतो, तेव्हा कोणत्याही स्त्रीला त्याच्यासोबत राहणे अशक्य होते. आणि तरीही मीना कुमारी एकत्र राहिले पण हे तिला अशक्य होतं. 

5/7

पतीसाठी परपुरुषासोबत संबंध

एकदा रागाच्या भरात कमालने मीनाला तलाक दिल्याचे सांगितले जाते. नंतर त्याला पश्चात्ताप झाला आणि तो पुन्हा लग्नाची विनंती घेऊन आला. प्रेमात वेडी झालेल्या मीनालाही त्याच्याकडे परत जायचे होते. मात्र यासाठी परंपरेनुसार अभिनेत्रीला हलाला करावा लागला.  मीनाचे लग्न झीनत अमानचे वडील अमान उल्ला खान यांच्याशी झाले होते, असे सांगितले जाते. दोघेही एकत्र झोपले आणि मग तिथून घटस्फोट झाल्यावर ती कमलशी लग्न करू शकली. ही अशी जखम होती जी मीना आयुष्यभर विसरू शकली नाही. तिने स्वतःची तुलना 'वेश्या'शीही केली आणि याचा उल्लेख तिच्या चरित्रात आहे. प्रेमाचा दावा करणारा कोणता नवरा आपल्या बायकोशी असे वागू शकतो? असे वागणारा माणूस आपल्या बायकोला माणूस म्हणून कमी आणि बाहुली म्हणून जास्त समजतो. सत्य हेच आहे की, असा नवरा कुणाला मिळाला, तर अशाप्रकारे आपला स्वाभिमान गहाण ठेवून त्याच्याशी पुन्हा एकत्र येण्याचा विचारही करू नये.

6/7

असिस्टंटने लगावली कानाखाली

मीनाच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कमाल अमरोही यांचे प्रयत्न नेहमीच असायचे. अभिनेत्रीवर लक्ष ठेवण्याचे काम त्याने सहायक बकर अलीकडे सोपवले. त्यामुळे मीनाला सेटवरुन उठणेही अवघड झाले होते. असिस्टंट तिच्यावर एवढ्या प्रमाणात नियंत्रण ठेवायचा की, मीना कुमारी अक्षरशः सेटवर रडायची. एवढेच नाही तर एकदा त्याने मीनावर हातही उचलला होता. असे असूनही कमाल काहीच बोलला नाही आणि मग अशी वेळ आली जेव्हा मीनाने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. मीनाचे हे पाऊल कदाचित तिने आधी उचलले असावे. जेव्हा तुम्हाला कोणाचे महत्त्व नसते आणि तुमचा स्वाभिमान अशा प्रकारे ठेचला जातो, तेव्हा त्या व्यक्तीसोबत आयुष्य का घालवायचे?

7/7

अखेर असा झाला शेवट

आयुष्य आणि नवऱ्याने इतक्या जखमा दिल्या की मीना दारूच्या दुनियेत ओढली गेली. कमालच्या विनंतीनंतर त्यांनी पाकीजा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले, परंतु तिची तब्येत इतकी बिघडली की अनेक दृश्यांमध्ये बॉडी डबल्स वापरावे लागले. शेवटी याच दारूने तिला सर्वांपासून दूर खेचले. मीनाचा मृत्यूही इतर मुलींसाठी धडा असल्यासारखा वाटत होता. आपल्या जोडीदारासाठी कोणी एवढ्या टोकाला जावू नये की, यामुळे आपलं आयुष्य नरक बनते?