Bhadra Rajyog : 24 जूनला विशेष राजयोग! बुध करणार मिथुन राशीत गोचर; 'या' राशी होणार मालामाल?

Bhadra Mahapurush Rajyog 2023 : 24 जूनला बुध गोचरमुळे कुंडलीत भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. या राजगोगामुळे काही राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. 

Jun 05, 2023, 14:58 PM IST

Bhadra Mahapurush Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांचा परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. सर्व ग्रह हे एका ठराविक वेळेनंतर राशिचक्र बदलतात. त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर वाईट किंवा चांगला परिणाम दिसून येतो. (mercury will transit in gemini bhadra mahapurush rajyog be formed on 24 june get money these zodiac signs)

1/7

जून ग्रह गोचर

या जून महिन्यामध्ये बुध, सूर्य (Surya Transit 2023), शुक्र आणि मंगळ (Mangal Gochar 2023) हे पाच ग्रह आपली स्थिती परिवर्तन करणार आहे. तर शनि (Shani Vakri 2023) आपली उलटी चाल चलणार आहे. 

2/7

बुध गोचर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा (Budh Gochar 2023) राजकुमार  बुध  7 जून 2023 ला सायंकाळी 7.40 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) आणि गजकेसरी राजयोग (Gajkesari Rajyog) तयार होईल.

3/7

बुध अस्त

 बुध गोचर झाल्यानंतर 19 जून  2023 बुध वृषभ राशीत अस्त (Budh Asta 2023) होणार आहे.  (Budh Rashi Parivartan 2023) याचा परिणाम काही राशींवर नकारात्मक दिसून येणार आहे.  

4/7

भद्रा महापुरुष राजयोग

यानंतर राजकुमार 24 जून 2023 दुपारी 12:35 वाजता मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. मिथुन राशीत बुध 8 जुलै 2023 दुपारी 12.05 मिनिटांपर्यंत असणार आहे. बुध गोचरमुळे भद्रा महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. 

5/7

मिथुन (Gemini)

या राशीसाठी भद्रा महापुरुष राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. गाडी आणि मालमत्ता खरेदीची सुवर्ण योग चालून आले आहेत. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार हा योग ठरणार आहे.

6/7

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी भद्रा महापुरुष योगामुळे नशिब पालटणार आहे. समाजात मानसन्मान वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. बेरोजगाऱ्यांना नोकरी मिळणार आहे. महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडणार आहे. 

7/7

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना भद्रा महापुरुष राजयोग लाभदायक ठरणार आहे. धन आणि संपत्तीतीत वाढ होणार आहे. परदेश वारीचे योग आहेत. करिअरमध्ये बदल घडणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)