Lockdown-2 : एक वर्षाच्या बाळाला घेऊन जोडप्याचा सायकलने प्रवास

कोरोनाचा व्हायरसने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे. 

Apr 17, 2020, 18:29 PM IST

कोरोनाचा व्हायरसने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे. या  धोकादायक विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सर्व छोटे-मोठे उद्योग बंद करण्यात आहेत. शिवाय सर्व वाहतूक सेवा देखील बंद आहेत. त्याचा मोठा फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. परिणामी त्यांनी आपला मोर्चा आपल्या गावाकडे वळवला आहे.

1/5

एक वर्षाच्या बाळाला घेवून जोडपं मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना

एक वर्षाच्या बाळाला घेवून जोडपं मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना

'मी आणि माझे पती एक वर्षाच्या बाळाला घेऊन मध्य प्रदेशच्या दिशेने सायकलने प्रवास करत आहेत. १४ तारखेपासून बस सुरू होतील म्हणून आम्ही प्रतिक्षा करत होतो पण तसं काही झालं नाही' म्हणून या जोडप्यानं अखेर सायकलचा मार्ग अवलंबला.   

2/5

शिवाय काही कामगारांनी गाव गाठण्यासाठी ५ दिवसांपूर्वी आपला प्रवास सुरू केला आहे,  

3/5

नाशिकवरून निघालेल्या या कामगारांना पायी गावी पोहोचण्यासाठी आणखी ६ दिवस लागणार आहेत. 

4/5

लॉकडाऊन दरम्यान या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. 

5/5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांनी आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.