बॉलिवूड पदार्पणाआधीच 'मिस वर्ल्ड' मानुषीचा मोठा खुलासा

'पृथ्वीराज' चित्रपटात मानुषी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे.   

Mar 07, 2020, 16:51 PM IST

मुंबई : 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर लवकरच अभिनेता अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटात मानुषी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तिने स्वत:बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

1/5

मानुषीला शालेय जीवनापासूनच इतिहासात फार रस होता.   

2/5

मानुषी म्हणते, 'लहानपाणापासूनच मला इतिहास हा विषय आवडत होता. मला राज्ये आणि शूर राज्यकर्त्यांच्या कथा आवडतात.'  

3/5

'पृथ्वीराज आणि संयोगिताच्या कथेने तर मला नेहमीच आकर्षित केले. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे.'  

4/5

या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क ३५ भव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये या ऐतिहासिक सेटची निर्मिती होणार आहे.   

5/5

'पृथ्वीराज' चित्रपट २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x