रेशनकार्ड धारकांसाठी मोदी सरकारचे गिफ्ट; केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणार विशेष सुविधा

शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुमच्याकडेही जर रेशनकार्ड असेल तर मोफत रेशनसोबत तुम्हाला आता केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष सुविधा मिळणार आहेत. मोफत रेशनसोबतच आता अनेक कोटी कार्डधारकांना मोफत उपचाराची सुविधाही मिळणार आहे.

Mar 12, 2023, 14:05 PM IST

मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत अंत्योदय रेशनकार्ड (antyodaya ration card) असणाऱ्या सर्व कुटुंबांना आणखी एक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड (ayushman card) बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी जिल्हा व तहसील स्तरावरही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

1/6

pm modi

गरिबांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारने अभियानांतर्गत अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्मान कार्ड बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

2/6

ayushman card

या निर्णयानंतर ज्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही ते जिल्हा आणि तहसील स्तरावरील संबंधित विभागात जाऊन कार्ड बनवून घेऊ शकतात.

3/6

Community Health Centre

यासाठी पात्र असणारे लाभार्थी जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान योजनेशी जोडली गेलेली खाजगी रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवू शकतात.

4/6

health related problem

अंत्योदय कार्डधारकांना आयुष्मान कार्ड मिळाल्यानंतर आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी भटकावे लागणार नाही. शासनस्तरावरूनही जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

5/6

medical help

या योजनेअंतर्गत अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतची आणि इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबांना 50 हजार रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत मिळणार आहे

6/6

BPL Ration card

दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका दिली जाते. या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात रेशन मिळते. या कार्डधारकांना एकूण 35 किलो गहू व तांदूळ दिले जाते. अशा कुटुंबांना गहू 2 रुपये किलो आणि तांदूळ 3 रुपये किलोने दिले जातात.