मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...
Mohammed Siraj: मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.
Mohammed Siraj: मोहम्मद सिराज आज घातक गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. एकट्या सिराजने श्रीलंकेचा अर्धा संघ बाद केलाय. पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि दसुन शानाका, कुसल मेंडीस यांना बाद केलंय. मोहम्मद सिराजचे देशभरातून कौतुक होतंय. पण त्याचे हे कौतुक पाहायला त्याचे वडिल आज हयात नाहीत. त्यांनी रिक्षा चालवून सिराजला क्रिकेटर बनवलं. सिराजच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.