Cricket News : आळशी कुठचे...! 'या' खेळाडूंचा आळस पाहून डोकं धराल, यादीत भारतातील खेळाडूचंही नाव

Most Run out in ODI: आता खेळाडू आळशी कसे? तर ही मंडळी सर्वाधिक वेळा धावबाद म्हणजे RunOut झाली आहेत. यामध्ये एका भारतीय खेळाडूचंही नाव आहे बरं.  

Mar 22, 2023, 14:40 PM IST

Most Run out in ODI: क्रिकेटच्या मैदानात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या नजरा वळवत असते. असं हे मैदान गाजवत अनेक खेळाडूंनी आजवर स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. पण, काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी कितीही चांगला खेळ दाखवला तरी त्यांच्या वाईट खेळीचीच जास्त चर्चा झाली. बरं, काही खेळाडू तर त्यांच्या कथित आळशीपणामुळं चर्चेचा विषय ठरले.

 

1/6

Rahul Dravid

Most Run out in cricket players in ODI rahul dravid to wasim akram see photos

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी खेळाडू, राहुल द्रविडचाही या यादीत समावेश आहे. तो 249 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29 वेळा धावबाद झाला आहे.  

2/6

mohammed yusuf

Most Run out in cricket players in ODI rahul dravid to wasim akram see photos

पाकिस्तानचे बरेच खेळाडू या यादीत आहेत. पुढचं नाव आहे मोहम्मद युसूफचं. 191 सामन्यांमध्ये तो 30 वेळा धावबाद झाला आहे.

3/6

mark waugh

Most Run out in cricket players in ODI rahul dravid to wasim akram see photos

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्क वॉ 232 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32 वेळा धावबाद झाला आहे.  

4/6

Mohammad Azharuddin

Most Run out in cricket players in ODI rahul dravid to wasim akram see photos

भारतीय संघातील खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 208 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32 वेळा धावबाद झाला आहे.

5/6

inzamam-ul-haq

Most Run out in cricket players in ODI rahul dravid to wasim akram see photos

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक् हासुद्धा 38 वेळा धावबाद झाला आहे. पण, त्याच्या नावे 322 एकदिवसीय सामने आहेत.  

6/6

wasim akram

Most Run out in cricket players in ODI rahul dravid to wasim akram see photos

सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी आहे तो म्हणजे पाकिस्तानचा खेळाडू वसिम अक्रम. 280 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो 38 वेळा रनआऊट झाला आहे.