#Trending : साऊथच्या या हिरोची नक्कल करतोय शाहिद

Nov 28, 2018, 14:58 PM IST
1/5

विजय देवरकोंडाचा सोशल मीडियावर धुमाकूळ

विजय देवरकोंडाचा सोशल मीडियावर धुमाकूळ

शाहिद कपूरने बॉलिवूड चॉकलेट बॉय ते अगदी एंग्री यंग पर्यंत सगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शाहिद सध्या 'कबीर सिंह' या भूमिकेत व्यस्त आहे. शाहिदचा हा सिनेमा साऊथचा सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून शाहिदचा लूक कसा असणार यावर चर्चा सुरू आहे. 

2/5

शाहिद कपूरचा 'कबीर सिंह' हा सिनेमा चर्चेत

शाहिद कपूरचा 'कबीर सिंह' हा सिनेमा चर्चेत

'अर्जुन रेड्डी' हा तेलुगु सुपरहिट सिनेमा असून विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे मुख्य भूमिकेत होते. आता हिंदीमध्ये ही भूमिका शाहिद कपूर आणि कियारा साकारणार आहे. तेलुगुमध्ये हा सिनेमा संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला असून आता हिंदी सिनेमा देखील तेच करणार आहेत. हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

3/5

शाहिदचा सिनेमा साऊथचा सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक

शाहिदचा सिनेमा साऊथचा सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक

तेलुगु सिनेमात अर्जुन रेड्डी यांची भूमिका विजय देवरकोंडाने साकारली आहे. आता शाहिद या सिनेमाकरता विजय देवरकोंडाकरता लूक करण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर विजय देवरकोंडाची चाहती आहे. ती त्याच्यासोबत सिनेमा करण्यासाठी उत्सुक आहे. 

4/5

अर्जुन रेड्डीचं कॅरेक्टर विजय देवरकोंडाने सादर केलं होतं

अर्जुन रेड्डीचं कॅरेक्टर विजय देवरकोंडाने सादर केलं होतं

आपल्या करिअरची सुरूवात विजय देवरकोंडाने थिएटरपासून केलं आहे. 2011 मध्ये विजय देवरकोंडाने साऊथच्या सिनेमातून करिअरला सुरूवात केलं. आतापर्यंत अर्जुन रेड्डीसारख्या सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. `अर्जुन रेड्डी`सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्यांच्या 'Pelli Choopulu` ला नॅशनल अॅवॉर्ड मिळाला आहे  

5/5

विजय देवरकोंडा तेलंगणात राहणारा

विजय देवरकोंडा तेलंगणात राहणारा

गेल्या 7 वर्षांच्या करिअरमध्ये विजय देवरकोंडाच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ होत आहे. विजयकडे आता अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत.