वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा पत्ता कट? 'हा' खेळाडू घेणार जागा, स्वत: MS Dhoni ने दिलीये ट्रेनिंग!

Indian Cricket Team : वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा ( Hardik Pandya) पत्ता कट होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Aug 28, 2023, 21:44 PM IST

Hardik Pandya Team India : टीम इंडियाच्या सर्वात खतरनाक ऑलराऊंडरपैकी एक म्हणून हार्दिक पांड्याची ओळख आहे. आजही मोठमोठे सिक्स आणि सामना जिंकवण्याची ताकद हार्दिक ठेवतो.

1/6

भारत vs वेस्ट इंडिज

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामने खेळवले गेले. मात्र, टीम इंडियाला या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला.

2/6

फलंदाजीवर प्रश्नचिन्ह

मालिकेत झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. तर त्याच्या फलंदाजीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.  

3/6

नव्या ऑलराऊंडरची गरज?

आता हार्दिकच्या जागी नव्या ऑलराऊंडरची गरज असल्याची चर्चा क्रिडाविश्वास होत आहे. तर दुसरीक़डे पांड्याची जागा घेणारा खेळाडू धमाका करताना दिसतोय.

4/6

धोनीची ट्रेनिंग

हार्दिक पांड्याला संघातून क्वचितच वगळलं जातं. पण लवकरच टीम इंडियामध्ये पांड्यापेक्षाही घातक अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री होऊ शकते, स्वत: धोनीने या खेळाडूला ट्रेनिंग दिली आहे.

5/6

राजवर्धन हंगरगेकर

होय, अंडर-19 वर्ल्ड चॅम्पियन राजवर्धन हंगरगेकरबद्दल आपण बोलतोय. फक्त 20 वर्षीय राजवर्धनने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने खूप प्रभावित केलंय.

6/6

चेन्नई सुपर किंग्ज

राजवर्धन हंगरगेकर हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. एमर्जिंग आशिया कपमध्ये राजवर्धन हंगरगेकरने पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट घेतले होते. तर लांबच्या लांब सिक्स खेचण्यासाठी त्याची ओळख आहे.