लॉकडाऊनमध्येही ही मंडळी रस्त्यावरच; हे चित्र सुधारायचं कधी ?

Apr 03, 2020, 15:48 PM IST
1/5

Coronavirus कोरोना व्हायरस सर्वत्र थैमान घालत असतानाच भारतातही त्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परिणामी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली. 

2/5

अनेकांनीच त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. 

3/5

मुंबईतील बहुतांश ठिकाणी मात्र लॉकडाऊन अक्षरश: थट्टा बनून राहिलं आहे. घरातून बाहेर पडू नका असं सांगूनही त्याचा काही नागरिकांवर मात्र परिणाम होताना दिसत नाही आहे.  

4/5

कोरोनाच्या संकटाचं काहीच गांभीर्य नसल्यासारखे अनेक नागरिक हे सायन, प्रतिक्षा नगर, दादर भाजी मंडई या परिसरांमध्ये गर्दी करताना अद्यापही दिसत आहे. 

5/5

सोशल डिस्टंसिंग पाळा, घरातच राहा अशा अनेक सुचना वारंवार करुनही मुंबईकर मात्र 'हम नही सुधरेंगे' अशाच काहीशा भूमिकेत दिसत आहे. ही वेळ एकमेकांवर आरोप न करता प्रशासनाचे निर्देश पाळण्याची आहे. त्यामुळे घरातच राहा आणि कोरोनावर मात करा. तुमच्या सहकार्यानेच मोठा फरक पडणार आहे.