मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक बंद; पाहा कोणत्या वेळात तिथं जाणं टाळावं

Mumbai Pune express way : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेनं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर आधी ही बातमी वाचा... 

Jan 17, 2024, 10:47 AM IST

Mumbai Pune express way : दर दिवशी मोठ्या संख्येनं मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास केला जातो. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या मार्गामुळं प्रवासाच्या वेळात बरीच बचत होते. 

1/7

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

Mumbai Pune express way : तुम्हीही येत्या काही तासांमध्ये संख्येनं मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करण्याच्या विचाराता आहात का? तर, तुम्हाला प्रवासाची आखणी नव्यानं केली जाऊ शकते.   

2/7

रेल्वे कॉरिडोरचं काम

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

मुंबई पुणे एक्सप्रेस वे अर्थात यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई लेनवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम हाती घेण्यात आलं आहे.   

3/7

कुठे होणार काम?

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

चिखले ब्रिज येथे हे काम करण्यात येणार आहे. ज्यासाठी गुरुवारी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

4/7

वाहतूक बंद

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

ब्लॉक काळात या दरम्यान सर्व प्रकारची वाहनं (हलकी आणि अवजड वाहने) यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

5/7

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

ब्लॉकदरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून मार्गस्त करता येणार आहेत. 

6/7

महामार्ग क्रमांक 48 वरून मार्गस्थ

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

या काळात पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहनं मार्गिका किमी 55000 वरून पुढे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मार्गस्थ करण्यात येणार आहेत.   

7/7

कसा असेल पर्यायी प्रवास?

Mumbai Pune express way to closed for traffic for six hours latest update

पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहनं पनवेल एक्झिटवरून वळवून महामार्ग क्रमांक 48 वरून करंजाडे कळंबोली तर, महामार्ग क्रमांक 48 वरून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहनं शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेनं पुढे जातील.