उन्हाळ्यात फिरायला जायचं? मग 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या

National Parks You Must Visit In Maharashtra : विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत कुठे फिरायला जायचं असा प्रश्न पडतो.  जर तुम्हाला उन्हाळी सुट्टी फिरायल जायचं असेल तर  महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या.  

Mar 14, 2024, 15:49 PM IST
1/7

गुगामल

मेळघाट येथीव गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान असून ते 361.28 चौ. किमी क्षेत्रावर वसले आहे. 

2/7

पेंच (पंडित जवाहरलाल नेहरु उद्यान)

नागपूरमधील पेंच अर्थात पंडित जवाहरलाल नेहरु उद्यान हे अतिशय प्रसिद्ध असे राष्ट्रीय उद्यान असून ते 257.98 चौ. किमी क्षेत्रावर पसरलं आहे. 

3/7

चांदोली

सांगलीतील शिराळा येथील चांदोली येथे 317.67 चौ. किमी क्षेत्रावर असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा 2004 मध्ये करण्यात आली होती. 

4/7

नवेगाव बांध

गोदिंयात असलेले नवेगाव बांध 133.88 चौ. किमी क्षेत्राचं राष्ट्रीय उद्यान आहे. याची घोषणा 1975 मध्ये करण्यात आली. 

5/7

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईत बोरीवली या भागातील 103.09 चौ. किमी क्षेत्रावर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा 1983 मध्ये करण्यात आली होती. या उद्यानात नेहमी गर्दी पाहायला मिळते. 

6/7

ताडोबा

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. 115.14 चौ. किमी क्षेत्रावर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानात पशू पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती पाहावयास मिळतात. 

7/7

सरकारकडून जंगले, त्यातील वनस्पतींच्या विविध प्रजाती, प्राण्यांच्या प्रजाती टिकाव्या म्हणून विविध प्रकारच्या उपाययोजना करत राष्ट्रीय उद्यान उभारण्यात आली.