विदर्भ, मराठवाड्याला विभागणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा; धडकी भरवणारा आक्राळविक्राळ प्रवाह

चांगल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडुन वाहतोय. 

| Aug 01, 2024, 00:20 AM IST

Nanded Sahastrakund Waterfall : नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा निसर्गानं बहरलाय... हा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करतायेत. धबधब्याचा आक्राळविक्राळ प्रवाह पाहून धडकी भरतेय.

1/7

विदर्भ आणि मराठवाड्याला विभागना-या पैनगंगा नदीवर नांदेड जिल्ह्यातील ईस्लापुर येथे हा विहंगम धबधबा आहे

2/7

नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फी आणि रिल्ससाठी तरूणांची स्टंटबाजी सुरू आहे. याठिकाणी तरूण लोखंडी रेलिंगवर चढून तर काही तरूण दगडांच्या कपारीत खाली उतरून फोटो काढताना दिसतायत.

3/7

 धबधबा पाहण्यासाठी मराठवाड्याच्या बाजुने रॅम्प तयार करण्यात आलाय... त्यामुळे पर्यंटकांना अगदी जवळुन हा धबधबा पाहायला मिळतो.   

4/7

पैंनगंगा नदीचे पात्र या ठिकाणी थेट 40 ते 45 फुट खोल असल्याने नदीला पाणि आल्यानंतर हा धबधबा अतीशय विक्राळ दिसतो..  

5/7

 पावसाळ्यात हा धबधबा पाहणे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते..

6/7

पैंनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत असल्याने हा धबधबा ओसंडुन वाहतोय.

7/7

पैनगंगा नदीच्या पाणीपातळी वाढ झाल्यानं हा धबधबा प्रवाहित झाला आहे.