राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक भिडले; तणावाची परिस्थिती मांडणारे फोटो

राणेंच्या वक्तव्यानंतर राज्यभर पडसाद पाहायला मिळत आहेत. 

Aug 24, 2021, 12:10 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्यात सर्वत्र शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरणं तापलं आहे. राणेंचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.  जुहूत राणेंच्या बंगल्याबाहेर तणाव वाढत आहे. 

1/5

राणेंच्या वक्तव्यानंतर राज्यभर पडसाद पाहायला मिळत आहेत.     

2/5

3/5

राज्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  

4/5

केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना या वादाने आक्रमक रूप धारण केलं आहे.   

5/5

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याजवळ भाजप-शिवसेना आमनेसामने भिडले आहेत.