National Girl Child Day Wishes: लाडक्या लेकीला द्या राष्ट्रीय बालिका दिनाच्या खास शुभेच्छा, साजरा करा हा क्षण
National Girl Child Day Wishes : ज्या घरात लेक असते त्या घरात कायम आनंद नांदत असतो, असं म्हणतात. 24 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा 'राष्ट्रीय बालिका दिन' या शुभेच्छांनी करा अधिकच खास.
National Girl Child Day Wishes in Marathi: आजही अनेक ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. मुलींना त्यांच्या सर्व हक्कांपासून वंचित ठेवले जाते. समाजातील या परिस्थितींवर मात करण्यासाठी आणि मुलींना त्यांच्या सन्मानाची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिवस 2024 दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मात्र, भारतातील या दिवसाचा इतिहास इंदिरा गांधींशी संबंधित आहे. राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन हा क्षण लेकीसोबत साजरा करा.