नीरज चोप्राला का म्हटलं जातं 'सरपंच'? काय आहे बालपणीचा किस्सा?

Neeraj Chopra Nickname : भारताचा ऑलिम्पिक स्टार खेळाडू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवासणी घातली. मात्र, अजून तो महिनाभर भारतात येऊ शकणार नाहीये.

| Aug 13, 2024, 20:13 PM IST
1/6

नीरजवर शस्त्रक्रिया

नीरज चोप्रा दुखापतीवर संभाव्य शस्त्रक्रिया आणि आगामी डायमंड लीग स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा की नाही याबद्दल वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जर्मनीला रवाना झालाय.

2/6

नीरजचं टोपण नाव

खूप कमी लोकांना माहितीये की, नीरज चोप्राला टोपण नाव देखील आहे. त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याला टोपण नावानेच ओळखतात.

3/6

सरपंच

नीरज चोप्राला सरपंच या नावाने देखील बोलवतात. नीरजला हे नाव पडलं, त्याच्या बालपणी.. जेव्हा नीरजचे वडील त्याला एक कुर्ता घेऊन आले तेव्हा...

4/6

कुर्ता

बालपणी नीरजचं वजन खूप होतं. अपेक्षेपेक्षा जास्त त्याचं वजन होतं. वयाच्या 14 व्या वर्षी त्याचं वजन 70 किलो होतं. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला एक कुर्ता आणला.

5/6

मित्र चिडवायचे

जेव्हा नीरज हा कुर्ता घालायचा तेव्हा तो गावच्या सरपंच सारखा दिसायचा, असं त्याचे नातेवाईक सांगतात. त्याचे मित्र देखील त्याला याच नावाने चिडवायचे.

6/6

कठीण परिश्रम

पण नीरजने मैदान गाठलं अन् कठीण परिश्रम घेतले. पहिल्यांदा वजन कमी केलं आणि भालाफेकसाठी त्याने तयारी केली अन् भारताला मेडल आणून दिलेत.