Ab de Villiers On GOAT: ना विराट ना बटलर, Mr 360 म्हणतो 'हा' खेळाडू IPL चा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम!

Greatest of all time in IPL: आरसीबीचा माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याने ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) खेळाडू कोण? याचं उत्तर दिलं आहे.

Apr 15, 2023, 18:16 PM IST

Ab De Villiers On MS Dhoni :आयपीएल म्हणजे वाजत गाजत साजरा केला जाणारा तमाशा. सर्वात श्रीमंत लीगमध्ये (IPL 2023) देश-विदेशातील अनेक खेळाडू भाग घेतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. गेल्या आठवड्यापासून आयपीएलचे सामने रंगतदार होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आरसीबीचा माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याने ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) खेळाडू कोण? याचं उत्तर दिलं आहे.

1/5

एबी डिव्हिलियर्सने आयपीएलच्या (IPL 2023) 'सर्वकाळातील महान' खेळाडूचं नाव घेतलं आहे. ABD ने Jio Cinema वर विचारलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर दिली.

2/5

आयपीएलचा 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (IPL GOAT) कोण आहे? असा सवाल Ab De Villiers ला प्रश्न विचारण्यात आला.

3/5

एबीडी ( Ab De Villiers) आणि विराट (Virat Kohli) खास मित्र आहेत. दोघांनी अनेक सामने एकत्र खेळले देखील आहेत. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देताना एबीडीने विराटचं नाव घेतलं नाही.

4/5

ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (Greatest of all time) असा प्लेयर कोण? या प्रश्नाला सामोरं जाताना डिव्हिलियर्सने चेन्नई सूपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याचं नाव घेतलं आहे.

5/5

दरम्यान, धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, चेन्नईने 4 वेळा IPL विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, असं डिव्हिलियर्स (Ab De Villiers On MS Dhoni) म्हणाला आहे.