T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार? हार्दिक पांड्याला मिळणार नारळ?

T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. 

| Apr 29, 2024, 20:50 PM IST

Rishabh Pant New Vice Captain : आयपीएलमध्ये काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असल्याने निवड समितीसमोर अनेक पर्याय आहेत. अशातच आता टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

1/7

अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळणार आहे. तर दुसरीकडे व्हाईस कॅप्टन कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही. 

2/7

अशातच आता ऋषभ पंतच नाव समोर येताना दिसतंय. टीम इंडियाचा टी-ट्वेंटी उपकर्णधार हार्दिक पांड्या याला नारळ मिळण्याची शक्यता आहे.

3/7

मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील कामगिरी अन् हार्दिकची कॅप्टन्सी पाहता. त्याला नारळ दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर त्याला गोलंदाजीमध्ये देखील खास कामगिरी करता आली नाहीये.

4/7

ऋषभ पंतचा संघ दिल्ली कॅपिटल्स यंदा चांगली कामगिरी करतोय. ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीने 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ऋषभवर विश्वास दाखवला जाऊ शकतो.  

5/7

विकेटकिपर म्हणून देखील ऋषभ पंतच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे. रोहित शर्मा आपल्या लाडक्या खेळाडूवर विश्वास दाखवू शकतो.

6/7

एकीकडे युवा आक्रमक खेळाडू संघात येण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे जुने खेळाडू देखील उत्तम कामगिरी करतायेत. त्यामुळे आता नेमकं कोणाला संघात घ्यावं? असा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे.

7/7

यंदाचा आयपीएल हंगाम खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या बदलाकडे घेऊन चाललाय. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या दृष्टीने देखील संघ मजबुतीसाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.